दबंद-३ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार दाखल

    दिनांक : 29-Nov-2019
मुंबई: २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा सलमान खान चा बहुचर्चित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जात आहे, म्हणून 'हिंदू जनजागृती समिती'तर्फे सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करण्यात आली आहे. या चित्रपटातील हूड हूड या गाण्यात हिंदू साधूना नाचताना व गिटार वाजविताना दाखविण्यात आले आहे. तसेच राम, कृष्ण व भगवान शंकर यांनाही दाखविण्यात आले आहे.
 


 
 
 
सलमान खान व अरबाज खान यांच्या दबंद ३ हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. यु ट्यूब वर त्याचे ट्रेलर व हूड हूड हे हाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हूड हूड या गाण्यात हिंदु साधूना अश्लील व पाश्चात्य नृत्य करताना दाखविण्यात आले असून यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो असे हिंदू बांधवांचे म्हणणे आहे. देशात नैतिकता व सदाचरण अतिशय खालच्या पातळीवर आले असून चित्रपटांच्या माध्यमातून तरुणांना योग्य प्रबोधन व योग्य संदेश जाण्यापेक्षा सिनेमा म्हणजे केवळ कमाईचे साधन झाले आहे. असेही समितीने निवेदनात म्हंटले आहे.
 
 
बॉलीवूड चित्रपट वादाच्या भोवऱ्यात येण्याची हि पहिली वेळ नसून या पूर्वी पीके, ओ माय गॉड, प्रेमलीला, पद्मावती यासारख्या अनेक चित्रपटांनी हिंदू धर्माच्या व संस्कृतीच्या भावना दुखावणारे चित्रण व डायलॉग घेतल्यामुळे वादातीत ठरल्या आहेत. काही चित्रपटांचे वादातीत ठरण्याचे कारणे वेगळी असली तरीही बहुतेक वेळा हिंदूंच्या भावना दुखाल्याच्या तक्रारी अधिक आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृती व परंपरा यांना जाणीवपूर्वक चित्रपटांच्या माध्यमातून खच्चीकरण करून पाश्चात्य संस्कृतीचे मात्र उदात्तीकरण केले जात असल्याच्या प्रतिक्रिया हिंदुत्ववादी गटात होत आहे.
 
 
सोशल मीडियात जनभावना उग्र:
 
 
दबंद ३ सिनेमात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे हिंदू समाजाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या उग्र भावना व्यक्त करत या सिनेमाचा व सलमान खान चा निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात ट्विटरवर 'BoycottDabangg3' हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. "हिंदू धर्माला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षड्यंत्र असून ख्रिश्चन पादरी किंवा मुल्ला मौलवींना कधी अश्या प्रकारे चित्रित करू शकाल का?" असा उघड सवाल नेटकर्यांनी निर्मात्यांना विचारला आहे.