जळगाव विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्यासाठी सोय करावी

25 Nov 2019 12:36:23

जळगाव विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्यासाठी सोय करावी

खासदार रक्षाताई खडसे यांची लोकसभेत मागणी

जळगाव: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'उडान' योजनेंतर्गत महाराष्ट्रातील हवाई मार्गांवर प्रवासी विमान वाहतूक सुरू आहे. या मार्गावर विमान वाहतूक सुरू केल्यामुळे या विमान कंपन्याना अतिरिक्त मार्ग सरकारने उपलब्ध करून दिलेले आहेत. या विमान कंपन्या फायद्यातील विमान वाहतूक मार्गावरील वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत आणि उडाण योजनेअंतर्गत दिलेले वाहतूक मार्गावरील विमान वाहतूक व्यवस्था काही ना काही बहाणे दाखवून रद्द करत आहेत. असे सांगत खा. रक्षा खडसे यांनी केंद्र सरकार कडे जळगाव विमानतळ येथे रात्रीच्या वेळी विमान उतरतील अशी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. 

 

उडाण योजनेअंतर्गत दिलेले वाहतूक मार्गावरील विमानतळावर रात्रीची विमान उतरवण्यासाठी असलेली सोय नसल्यामुळे विमान कंपन्या वारंवार विमान वाहतूक व्यवस्था रद्द करत आहेत. जळगाव विमानतळावर अशाच पद्धतीने विमान कंपन्या विमान वाहतूक व्यवस्था हा बहाणा दाखवून रद्द केल्या आहेत. खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत मागणी केली आहे की उडाण योजनेअंतर्गत चालणाऱ्या सर्व विमान कंपन्यांच्या सेवेचे पुनरावलोकन करावे आणि उडाण योजनेअंतर्गत विमान वाहतूक मार्गवर विमान कंपन्यांनी कोणतेही बहाणे न दाखवता विमान सेवा चालवावी, असेही त्यांनी आपल्या मागणीत म्हंटले आहे.

ज्या ज्या विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सोय नाही त्या विमानतळावर सरकारने रात्री विमान उतरण्याची सोय उपलब्ध करावी. जेणेकरून केंद्र सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेमुळे सामान्य लोकांना विमान सेवेचा फायदा मिळत राहील असा आशावाद खा. रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.

Powered By Sangraha 9.0