जिल्हा दूधसंघातील २०० कर्मचारी कपातीचा निर्णय!

    दिनांक : 04-Aug-2022
Total Views |
जळगाव : येथील जिल्हा सहकारी दूधसंघावर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या आदेशाने प्रशासकीय मंडळाची नेमणूक करण्यात आली असताना कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत दूधसंघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी मंगळवारी २ ऑगस्ट रोजी पदभार घेत ६ लाखांची देयके अदा केली.
 

Vikas 
 
याविरोधात प्रशासक मंडळाने पोलिसात तक्रार दिली. यानंतर दूधसंघातील २०० कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय मुख्य प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतला आहे. प्रशासकीय मंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे. जिल्हा दूधसंघात कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार झाल्याच्या मुद्‌यावरून राज्य शासनाने चौकशी समिती गठीत करून संघाची सूत्रे प्रशासकांच्या हाती दिली आहेत. यानंतर दूधसंघाच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक घेऊन दूधदेयकांना मंजुरी दिली. त्यामुळे माजीमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती अरविंद देशमुख यांनी मंदाकिनी खडसे व खडसे गटाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर दूधसंघाने कर्मचारी कपातीचा निर्णय घेत मोठा धक्काच दिला आहे.