पाथरी येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

    दिनांक : 02-Aug-2022
Total Views |
जळगाव: तालुक्यातील पाथरी येथील ६५ वर्षीय वृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी घडल्याचे समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सखाराम बुधा धनगर (वय-६५) रा. पाथरी ता.जि.जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे.
 
 

fas 
 
 
 
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सखाराम धनगर हे आपली पत्नी, मुलगा, सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. शेतातील सततची नापीकी आणि आजारपणामुळे ते विंवचनेत होते. सोमवारी १ ऑगस्ट रोजी मुलगा, सुन व पत्नी हे सर्व शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी सखारा धनगर हे घरात एकटेच होते. दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. घरातील कुटुंब दुपारी घरी आले तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी बेबाबाई, मुलगा गोविंदा, सुन ज्योती, नातवंडे आणि दोन भाऊ असा परिवार आहे.