शिंदाड येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

    दिनांक : 02-Aug-2022
Total Views |
पाचोरा :, तालुक्यातील शिंदाड येथील एका ६० वर्षीय वृद्धाने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
 
 

sicide 
 
 
 
 
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, शिंदाड ता. पाचोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व समाज विकास शिक्षण मंडळाचे संचालक दयाराम नारायण चौधरी (वय – ६०) यांनी दि. २ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गावातीलच उत्तम महादु चौधरी यांचे शेतातील झाडास गळफास लावत आपली जीवन यात्रा संपवली. दयाराम चौधरी यांना ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. दयाराम चौधरी यांच्या आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
मयत दयाराम चौधरी यांचे पाश्चात्य पत्नी, दोन मुल, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.