जिल्हा दूध संघातील प्रशासक नियुक्ती कायम; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

    दिनांक : 02-Aug-2022
Total Views |
जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर नियुक्त करण्यात आलेली प्रशासक मंडळाची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मात्र प्रशासक मंडळास धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

Vikas  
 
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यावर शासनाने प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. शासनाच्या या निर्णयाला निवडून आलेल्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. त्या याचिकेवर सोमवारी (ता. १) न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने प्रशासक मंडळ नियुक्तीची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, मात्र प्रशासक मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असे आदेश दिले. याचिकाकर्ते संचालक मंडळातर्फे ॲड. विनायक होन यांनी काम पाहिले.