जळगाव : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीची प्रेमप्रकरणातून तिच्यासह प्रियकराची हत्या करण्यात आली. प्रियकराची गोळी मारुन तर बहिणीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. राकेश संजय राजपूत असं गोळी घालून हत्या कऱण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे, तर वर्षा समाधान कोळी असं मुलीचं नाव आहे. राकेशचं वय 22 वर्ष असून वर्षा 20 वर्षां होती. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या अल्पवयीन भावानेच दोघांची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. हत्या केल्यानंतर पिस्तूलासह पोलीस ठाण्यात पीडीत तरुणीचा भाऊ हजर झाला.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,
वर्षाच्या लहान भावासह इतर तीन जणांनी राकेश आणि वर्षा या दोघांना बाईकवरुन चोपडा ते वराडे मार्गावर असलेल्या नाल्याजवळ आणलं होतं. तिथं या दोघांची हत्या करण्यात आली. लहान भावाने बहिणीचा रुमालाने गळा दाबला आणि तिची हत्या केली. याघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात गेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तणावपूर्ण वातावरण आहे.या हत्याकांडप्रकरणी पोलिसांना दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तर इतर दोन संशयित आरोपींचा शोध सुरु आहे. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पीडीत तरुणीचा अल्पवयीन भाऊ यानेचे पोलीसांत फिर्याद दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक रावले हे करीत आहेत.प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाची गोळी मारुन तर तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायकबाब म्हणजे तरुणीच्या अल्पवयीन भावानेच दोघांची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. हत्या केल्यानंतर पिस्तूलासह पोलीस ठाण्यात पीडीत तरुणीचा भाऊ हजर झाला.