जनकल्याण अर्बन पतसंस्था प्लॉट घोटाळा प्रकरण : तहसील कार्यालयातील लिपीक शाम तिवारी अखेर निलंबीत !

    दिनांक : 10-Aug-2022
Total Views |
भुसावळ- : बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची परस्पर विक्री करण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला तहसील कार्यालयातील लिपीक शाम तिवारी यांना निलंबीत करण्यात आले आहे.
 
 
 
suspend
 
 
 
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, येथील जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे प्लॉट विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांचा बनावट आदेश वापरून परस्पर विक्री केल्याचे प्रकरण सध्या खूप गाजत आहे. यात धांडे याच्यासह अनेकांचा सहभाग असल्याचे गुन्हा दाखल झाल्यानंतरच्या चौकशीत निष्पन्न झाले. यावरून, भुसावळचे नायब तहसीलदार तसेच लिपीकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
 
दरम्यान, या प्रकरणातील संशयित तथा तहसील कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत असणार्‍या शाम तिवारी यांना निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ही कारवाई केली आहे. तर, नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शाम तिवारी आणि शशिकांत इंगळे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.