साळसूदपणाचा आव दाखवून , बोलण्यात गुंतवून महिलेकडील सोन्याचे दागिने लंपास !

    दिनांक : 10-Aug-2022
Total Views |

 
जळगाव-चोर चोरी करण्यासाठी काय काय शक्कल लढवतील याचा अंदाजच नाही . शहरातील आठवले हॉस्पिटल येथे कामानिमित्त आलेल्या महिलेचे त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवण्याचे सांगून अज्ञात दोन जणांनी २० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना मंगळवार ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
police
 
 
 
 
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका गणेश सनसे (वय-४६) रा. कुंभारवाडा, मारुती मंदिरजवळ, अमरधामरोड, जुने नाशिक हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार ९ ऑगस्ट रोजी महिला ह्या जळगाव शहरात कामानिमित्त आलेल्या होत्या. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील आठवले हॉस्पिटलजवळ उभे असतांना त्यांच्याजवळ दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी सांगितले की “तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवून घ्या] नाहीतर कोणीतरी चोरून घेऊन जाईल” असे सांगितले. त्यानुसार महिलेने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवत असतांना दोन जणांनी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने घेऊन निघून गेले.
 
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश निकम करीत आहे.