परिपूर्ण यश म्हणजे कठोर परिश्रम

    दिनांक : 10-Aug-2022
Total Views |
चिंतन
१९९७ मध्ये, वॉरेन बफे यांनी एक विचारप्रयोग प्रस्तावित केला, कल्पना करा की तुमच्या जन्माच्या २४ तास आधी एक जिन तुमच्याकडे येईल आणि म्हणेल की, तुम्ही ज्या समाजात प्रवेश करणार आहात त्या समाजाचे नियम तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्घतीने ठरवू शकता.
 

yash 
 
 
 
तुम्हाला सामाजिक नियम, आर्थिक नियम, सरकारी नियमांची रचना करायची आहे. ते नियम तुमच्या आयुष्यभर आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यभर आणि तुमच्या नातवंडांच्या आयुष्यभर चालतील. पण यात एक खास क्लुप्ती आहे, तुम्ही युनायटेड स्टेट्स किंवा अफगाणिस्तानमध्ये श्रीमंत किंवा गरीब, पुरुष किंवा स्त्री, अशक्त किंवा सक्षम शरीराने जन्माला येणार आहात, हे माहीत नाही. तुम्हाला फक्त एवढंच माहीत आहे की, तुम्हाला एका भल्यामोठ्या भांड्यातल्या ५.८ अब्ज चेंडूंमधून केवळ एक चेंडू काढायचा आहे आणि तो चेंडू तुमचं भाग्य ठरवणार आहे.
 
बफे हे यशात नशिबाच्या भूमिकेसाठी दीर्घकाळापासून समर्थक आहेत. त्यांच्या २०१४ च्या वार्षिक पत्रात त्यांनी लिहिले, मूक नशिबाने, चार्ली (माझा व्यवसाय भागीदार) आणि माझा जन्म युनायटेड स्टेट्समध्ये झाला आणि जन्माच्या या अपघातामुळे आम्हाला मिळालेल्या आश्चर्यकारक फायद्यांसाठी आम्ही कायमचे कृतज्ञ आहोत. अशाप्रकारे समजावून सांगितल्यावर, जन्म, यादृच्छिकता आणि नशिबाचे महत्त्व नाकारणे कठीण वाटते. खरंच, हे घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पण आपण एक दुसरी गोष्ट पाहू.
 
१९६९ मध्ये, व्हिएतनाम युद्धाच्या चौदाव्या वर्षी, To YouYou तु यूयू नावाच्या चिनी महिला शास्त्रज्ञाची बीजिंगमधील एका गुप्त संशोधन गटाच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली. युनिट फक्त त्याच्या कोड नावाने ओळखले जात असे : प्रोजेक्ट ५२३. चीन हा व्हिएतनामचा सहयोगी होता आणि प्रोजेक्ट ५२३ मलेरियाविरोधी औषधे विकसित करण्यासाठी तयार करण्यात आला होता, ज्यामुळे सैनिकांचा जीव वाचवता येऊ शकणार होता. मलेरियाचा आजार एक मोठी समस्या बनली होती. जसे अनेक व्हिएतनामी सैनिक युद्धात मरत होते तसेच ते जंगलात मलेरियाने मरत होते. तु यूयूने काही संदर्भ शोधून कामाला सुरुवात केली. तिने अनेक जुन्या लोकउपायांबद्दल वाचले. तिने शेकडो किंवा हजारो वर्षे जुने प्राचीन ग्रंथ शोधले. तिने दुर्गम प्रदेशात अशा वनस्पतींच्या शोधात प्रवास केला ज्यामध्ये उपचार असू शकतात. अनेक महिन्यांच्या कामानंतर, तिच्या चमूने ६०० हून अधिक झाडे, वनस्पती गोळा केल्या आणि जवळपास दोन हजार संभाव्य उपायांची यादी तयार केली. हळूहळू आणि पद्धतशीरपणे, तु यूयूने संभाव्य औषधांची यादी ३८० पर्यंत कमी केली आणि प्रयोगशाळेतील उंदरांवर त्यांची एक-एक चाचणी केली. हा प्रकल्पाचा सर्वात आव्हानात्मक टप्पा होता तसेच खूप कष्टाचे आणि कंटाळवाणे काम होते, विशेषत: जेव्हा एकामागून एक अपयशाचा सामना करावा लागत होता. शेकडो चाचण्या झाल्या. त्यापैकी कित्येक चाचण्यांचे निकाल नकारात्मक आले. पण एक चाचणी किंघाओ म्हणून ओळखल्या जाणाèया गोड वनस्पतीचा अर्क- त्यांना आश्वासक वाटला. To YouYou तु या चाचणीमुळे उत्साहित झाल्या होत्या, परंतु त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, वनस्पती केवळ अधूनमधून एक शक्तिशाली मलेरियाविरोधी औषध तयार करत होती, पण प्रत्येकवेळी नाही.
 
त्यांचे सहयोगी आधीच दोन वर्षांपासून काम करत होते, पण त्यांनी ठरवलं की, पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे. तू यांनी प्रत्येक चाचणीचे पुनरावलोकन केले आणि त्यांच्या चुकलेल्या किंवा नजरेतून सुटलेल्या गोष्टीबद्दल एक सुगावा शोधत प्रत्येक पुस्तक पुन्हा वाचले. एक दिवस अनाहूतपणे त्यांची नजर १,५०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'द हँडबुक ऑफ प्रिस्क्रिप्शन्स फॉर इमरजन्सीस' या प्राचीन चिनी पुस्तकातील एका वाक्यावर अडखळली. मुद्दा उष्णतेचा होता. अर्क काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान तापमान खूप जास्त असल्यास, किंघाओ या गोड वनस्पतीमधील सक्रिय घटक नष्ट होत होते. To YouYou तू यांनी कमी उकळत्या तापमानात पुन्हा प्रयोग केला आणि त्यांच्याकडे मलेरियाविरोधी औषध होते जे १०० टक्के काम करत होते. हे एक मोठे यश होते, परंतु खरे काम नुकतेच सुरू झाले होते.
 
एक सिद्ध औषध हातात असल्याने, आता मानवी चाचण्यांची वेळ आली होती. दुर्दैवाने, त्यावेळी चीनमध्ये नवीन औषधांच्या चाचण्या करणारी कोणतीही केंद्रे नव्हती. प्रकल्पाच्या गोपनीयतेमुळे, देशाबाहेर एखाद्या सुविधेकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्या त्यांच्या कार्याच्या शेवटपर्यंत पोहोचल्या होत्या पण हतबल ठरल्या होत्या. पण त्यांनी हार मानली नाही. मानवी शरीरावर उपचार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी त्या स्वत:वर हा प्रयोग करणार होत्या. वैद्यकीय विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय त्यांनी आणि प्रोजेक्ट-५२३ च्या इतर दोन सदस्यांनी घेतला. त्यांनी स्वत:ला मलेरियाची लागण केली आणि त्यांच्या नवीन औषधाची पहिली मात्रा घेतली. अपेक्षेप्रमाणे त्या औषधाने काम केले. मलेरिया विरोधी यशस्वी औषधाचा शोध लागला. स्वत:चा जीवाची पर्वा न करता इतका मोठा शोध लावूनही त्यांना हे निष्कर्ष बाहेरील जगाशी सामायिक करण्यापासून रोखले गेले. चीन सरकारचे कठोर नियम होते जे कोणत्याही वैज्ञानिक माहितीचे प्रकाशन रोखत होते. त्या हतबल होत्या. त्यांनी त्यांचे संशोधन चालू ठेवले. त्यांनी त्या औषधाची रासायनिक रचना शिकून घेतली. जे अधिकृतपणे आर्टेमिसिनिन म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी दुसरे मलेरियाविरोधी औषधही विकसित करण्यास सुरुवात केली.
 
मलेरियाविरोधी औषध तयार करण्यासाठी झालेल्या सुरुवातीनंतर जवळजवळ एक दशकानंतर आणि व्हिएतनाम युद्ध विरामाच्या तीन वर्षांनंतर अखेरीस १९७८ साली To YouYou यांचे काम शेवटी बाहेरच्या जगासाठी प्रसिद्ध झाले. वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मलेरियापासून बचाव म्हणून या उपचाराची शिफारस करेपर्यंत २००० साल उजाडले. आज, मलेरियाच्या रुग्णांना आर्टेमिसिनिन उपचार एक अब्जपेक्षा जास्त वेळा दिले गेले आहेत. यामुळे लाखो जीव वाचले, असे मानले जाते. तु यूयू ही नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी पहिली महिला चिनी नागरिक आहे आणि वैद्यकीय शास्त्रातील मोठ्या योगदानासाठी लास्कर पुरस्कार प्राप्त करणारी पहिली चिनी व्यक्ती आहे. तु यूयू फार भाग्यवान नव्हत्या. त्यांच्याबद्दलची माझी आवडती वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांचं पदव्युत्तर शिक्षण नाही, परदेशात संशोधनाचा अनुभव नाही आणि कोणत्याही चिनी राष्ट्रीय अकादमीमध्ये सदस्यत्व नाही. या कारणांमुळे त्यांना तीन क्रमांकाची प्राध्यापक असे टोपणनाव मिळाले. पण त्या एक मेहनती व्यक्ती आहेत. सतत मेहनत. अनेक दशकांपासून त्यांनी हार मानली नाही आणि परिणामी त्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवले. यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम किती महत्त्वाचे असू शकतात, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची कथा आहे.
 
फक्त काही मिनिटांपूर्वी, हे वाजवी वाटले की ओव्हेरियन लॉटरी तुमच्या आयुष्यातील बहुतेक यश निश्चित करते, परंतु कठोर परिश्रम महत्त्वाचे आहेत. ही कल्पना तितकीच महत्त्वाची वाटते. जेव्हा तुम्ही कठोर परिश्रम करता तेव्हा तुम्हाला कमी मेहनतीपेक्षा चांगले परिणाम मिळतात. नसीम तालेबनेफुल्ड बाय रँडमनेसमध्ये लिहिल्याप्रमाणे, कौशल्य आणि श्रमाने सौम्य यश समजावून सांगता येते. पण यश मिळवण्यासाठी भिन्न गोष्टी कारणीभूत आहेत. काहीवेळा लोकांना या दोन्ही अंतर्दृष्टी एकाच वेळी धारण करण्यात त्रास होतो. अमेरिकेत जन्मलेली श्रीमंत व्यक्त आणि अत्यंत गरिबीत जन्मलेली व दररोज एका डॉलरपेक्षा कमी खर्चात जगणारी व्यक्ती यांच्यात काय फरक आहे? या कोनातून यशाची चर्चा करताना, लोक नक्की हे प्रश्न विचारतात, तुला कळत नाही का की तुला किती सुखसुविधा मिळालेल्या आहेत? तुला कळत नाही का नशिबाने तुला किती दान दिले आहे?
 
कल्पना करा की तुम्ही आलेखावर यशाचा नकाशा बनवू शकता. यश (वाय) अक्षावर मोजले जाते, तर (एक्स) अक्षावर वेळ मोजला जातो. आणि तुमचा जन्म झाल्यावर, तुम्ही बफेटच्या ओव्हेरियन लॉटरीमधून जो चेंडू काढता तो (वाय) अक्ष ठरवतो. जे लोक भाग्यवान जन्माला येतात ते आलेखावर उच्च सुरुवात करतात. ज्यांचा जन्म कठीण परिस्थितीत होतो ते उताराला लागतात. येथे मुख्य गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या यशाचा उतार फक्त नियंत्रित करू शकता, तुमच्या सुरुवातीच्या स्थितीवर नाही. तुम्ही सध्या किती यशस्वी किंवा अयशस्वी आहात, त्याने काही फरक पडत नाही. तुमच्या सवयी तुम्हाला यशाच्या मार्गावर आणत आहेत की नाही, हे महत्त्वाचे आहे. सकारात्मकता, पुरेसा वेळ आणि कठोर मेहनत घेऊन तुम्ही दुर्दैवाने गमावलेला (वाय) अक्ष पुन्हा मिळवू शकता. हे अर्थातच नेहमीच खरे असते असे नाही. एखादा गंभीर आजार तुमचे आरोग्य नष्ट करू शकतो. निवृत्ती लाभ मिळवताना येणाऱ्या अडचणीमुळे तुमच्या सेवानिवृत्तीच्या बचतीचा नाश करू शकतो. त्याचप्रमाणे, काहीवेळा नशीब सतत फायदा किंवा तोटा देते.
 
To YouYou यू अ‍ॅण्ड युअर रिसर्च, गणितज्ज्ञ आणि संगणक अभियंता रिचर्ड हॅमिंग यांनी आपल्या विलक्षण भाषणात, महान कार्य करण्यासाठी काय आवश्यक आहे, हे सांगून सारांशित केले, खरोखर नशिबाचा घटक आहे आणि नाहीही. मोठ्या प्रमाणावर शोध घेणाऱ्याला अनेक निरुपयोगी पर्याय सापडतील, परंतु असेल माझा हरि... म्हणणाऱ्या व्यक्तीपेक्षा काही चांगले पर्यायही सापडतील. त्याचप्रमाणे, जी व्यक्ती कठोर परिश्रम करते, संधीचा पाठपुरावा करते आणि अधिक गोष्टींसाठी प्रयत्न करते ती प्रतीक्षा करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त भाग्यवान असण्याची शक्यता असते. गॅरी प्लेयर, प्रसिद्ध गोल्फर आणि नऊ प्रमुख चॅम्पियनशिपचे विजेते म्हणतात, मी जितका जास्त कठोर सराव करेन तितका जास्त भाग्यवान असेन. शेवटी, आपण आपले नशीब - चांगले किंवा वाईट - नियंत्रित करू शकत नाही - परंतु आपण आपल्या प्रयत्नांवर आणि तयारीवर नियंत्रण ठेवू शकतो. भाग्य वेळोवेळी आपल्या सर्वांवर हसते. जेव्हा असे होते, तेव्हा आपल्या नशिबाचा सन्मान करण्याचा मार्ग म्हणजे कठोर परिश्रम करणे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घेणे.
 
- गुरुदत्त वाकदेकर