जळगावात सोनार कारागीराला डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटले

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |
मोबाईलसह दोन हजार रोकड घेवून फरार

जळगाव : तीन चोरट्यांनी एका सोनार कारागीराच्या डोक्यात मिरचीपूड फेकून त्याचा मोबाइल, पैसे लुटले. शुक्रवारी रात्री शिवाजीनगर स्मशानभुमीजवळ ही घटना घडली. शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश परमानंद सोनी (वय ४३, रा. महावीरनगर) यांची लुट झाली आहे.

Loot 
 
घटना अशी की, सोनी हे सराफ बाजारात एका दुकानावर सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करतात. शुक्रवारी रात्री ते दुकानबंद करुन घराकडे निघाले होते. यावेळी शिवाजीनगर स्मशानभुमीजवळील निर्मनुष्य ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या एका भामट्याने त्यांना अडवले. आणखी दोन भामटे तेथे आले. तीनही भामट्यांनी सोनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. यामुळे सोनी यांच्या डोळ्यात जळजळ झाल्याने ते प्रतिकार करू शकले नाही.
संधी साधून भामट्यांनी त्यांचा २० हजार रुपयांचा मोबाईल, दोन हजार रुपयांची रोकड, लेदरची पिशवी व दुकानाच्या चाव्या घेऊन पळ काढला. सोनी यांनी घटनास्थळावरुनच शहर पोलिस ठाण्यात फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली. तोपर्यंत भामटे पसार झाले होते. या प्रकरणी सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दराेड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी तपास करीत आहेत.