शिवसेना-भाजपाच्या 13 मंत्र्याचा शपथविधी होणार १२ किंवा १३ जुलैला

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |
नवी दिल्ली – शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तारातील  पहिला टप्पा १२ किंवा १३ जूनला होण्याची शक्यता आहे. या पहिल्या टप्प्यात १३ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
 
 
 
 
shinde
 
 
 
यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. ११ जुलैला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर, शपथविधी होण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्या- अमित शाहा यांचा सल्ला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी द्या, असे अमित शाहा यांनी सांगितल्याची माहिती आहे. काही नावांसाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यामुळेच शाहा यांच्या निवासस्थानी काल रात्री सुमारके साडे चार तास चर्चा सुरु होती असे सांगितले जाते आहे.