कोरोना लसीकरणाकडे ७ लाखांहून अधिक जळगावकरांनी फिरवली पाठ

    दिनांक : 08-Jul-2022
Total Views |
नवी पिढी मात्र जागृत; ८१ टक्के किशोरवयीनांनी घेतली लस
 
कृष्णराज पाटील
 
जळगाव : गेल्या वर्षी 16 जानेवारी कोरोना संसर्ग प्रादूर्भावावर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाकडून संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरूवात करण्यात आली. आतापर्यत 60+, 18 ते 44+, व टप्प्याटप्प्यानुसार लसीकरण केले जात असून यावर्षी जानेवारी 2022 पासून 15 ते 17 आणि 12 ते 14 व 6 ते 12 या वयोगटानुसार देखील शाळा महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही जिल्हयातील 7 लाख 64 हजाराहून अधिक ‘लसवंतांनी’ लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.
 

vaccines 
 
 
राज्य व केंद्र शासन स्तरावरून कोरोना संसर्ग प्रादूर्भाव टाळण्यासाठी शास्त्रज्ञ व आरोग्य विभागस्तरावरून शर्थीचे प्रयत्न करून प्रतिबंधात्मक लस शोधण्यात यश मिळवत 16 जानेवारी 2021 पासून राज्यात तसेच जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत मार्गदर्शन निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकीत्सक व वैद्यकीय प्रशासन यांच्या स्तरावरून लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत प्राथमिक स्तरावर आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, 60+ वर्षे वयोगटावरील नागरिक, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व 45 ते 60 आणि त्यानंतर 18 ते 44 असे टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

7 लाख 4 हजार 802 नागरिकांनी फिरवली पाठ
 
जिल्ह्यात 36 लाख 32 हजार 498 लसीकरण पात्र लोकसंख्येपैकी पहिल्या टप्प्यात 29 लाख 27 हजार 696 नागरिकांनी पहिला (80.60%) तर 23 लाख 90 हजार 935 नागरिकांनी दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण झाले आहे. तर 7 लाख 4हजार 802 नागरिकांनी लसीकरणाचा एकही डोस घेतलाच नसल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. 60 वर्षे व त्यावरील तसेच 45 ते 59 वर्षे वयोगटावरील नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण 100 टक्के पूर्ण झाले असून दुसर्‍या टप्प्यात 88 टक्केहून अधिक लसीकरण झाले आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1559023 (79.78%) नागरिकांचे पहिल्या तर 1218765 (62.37%) नागरिकांचे दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे.

नवी पिढी मात्र जागृत
 
शाळा महाविद्यालयीन 15 ते 17 वयोगटात 140733 (62.30%) तर 96421 (42.68%) दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच 12 ते 14 वर्षे वयोगटात 146016 पैकी पहिल्या टप्प्यात 86786 (59.44%) तर 42334 (28.99%) दुसर्‍या टप्प्यात लसीकरण पूर्ण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात 165829 लाभार्थ्यांपैकी 119243 नागरिकांना (71.91%) प्रिकॉशन -बूस्टर डोसचा लाभ देण्यात आला आहे.
 
लसीकरणासाठी विद्यार्थ्यांसह जागृत पालकांच्या सहकार्याशिवाय लसीकरण अशक्य
 
संपूर्ण लसीकरणासाठी जिल्हयात वेळोवेळी जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. शाळा महाविद्यालयीन स्तरावर देखिल वेळोवेळी प्रबोधन करण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हाच एक प्रतिबंधात्मक उपाय असून विद्यार्थ्यांसह जागृत पालकांच्या तसेच जागृत नागरिकांच्या सहकार्याशिवाय जिल्हातील सर्वच लसीकरण पात्र नागरिकांचे लसीकरण करणे अशक्य आहे.
 
- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी