जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे काळाच्या पडद्याआड

भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर

    दिनांक : 08-Jul-2022
Total Views |
 भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर
 
नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज सकाळी नारा शहरात भाषण देत असताना पाठीमागून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मोदी यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. ते एक महान जागतिक राजकारणी, प्रशासक होते. त्यांनी आपले जीवन जपान आणि जगाला एक चांगले स्थान प्राप्त करून देण्यासाठी समर्पित केले.
 
modiji1
 
 
 
प्रधानमंत्री मोदी म्हणाले, शिंजो आबे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, त्यामुळे उद्या भारतात राष्ट्रीय शोक National Mourning दिवस असेल. 'माझा प्रिय मित्र शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने खूप दु:ख झाले आहे. आमचे विचार आणि प्रार्थना त्यांचे कुटुंब आणि जपानच्या लोकांसोबत आहेत. शिंजो आबे यांच्यासोबतचा माझा संबंध अनेक वर्षांचा आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांना ओळखत होतो. मी पंतप्रधान झाल्यानंतरही आमची मैत्री कायम होती.
 
अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींवर त्यांची असलेली तीक्ष्ण अंतर्दृष्टी माझ्यावर याचा खूप मोठा प्रभाव होता. भारत-जपान संबंध दृढ करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असायचे. त्यांनी नुकतेच जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारले होते. भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात शिंजो आबे यांचे मोठे योगदान आहे. या दु:खाच्या वेळी संपूर्ण भारत जपानच्या पाठीशी उभा आहे आणि या कठीण क्षणी आम्ही आमच्या जपानी बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहोत.
 
मोदी पुढे म्हणाले, माझ्या अलीकडील जपान दौऱ्यात मला त्यांना पुन्हा भेटण्याची आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. ते नेहमीप्रमाणेच विनोदी आणि समंजसपणे भेटले. ही आमची शेवटची भेट असेल याची मला कल्पना नव्हती. त्यांच्या कुटुंबियांप्रति तसेच जपानी लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत National Mourning शोक व्यक्त केला आहे की, 'भारत आणि जपानमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी काम करणारा एक जवळचा मित्र भारताने गमावला आहे'. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, 'भारत-जपान संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याबद्दल ऐकून धक्का बसला.' भारत आणि जपान यांच्यातील धोरणात्मक संबंध दृढ करण्यात त्यांची भूमिका कौतुकास्पद होती. इंडो-पॅसिफिकमध्ये त्यांनी चिरस्थायी वारसा सोडला आहे. त्यांचे कुटुंब आणि जपानच्या लोकांप्रती माझ्या संवेदना..