मर्सिडीज फिकी पडली!

    दिनांक : 07-Jul-2022
Total Views |

वेध


एखादा Maharashtra CM चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एखादी व्यक्ती या देशाचे सर्वोच्च पद गाठू शकते तर उमेदीच्या काळात रिक्षा चालविणारी व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. याचे कारण या देशातील संविधान. आपल्या देशाच्या संविधानाने ती ताकद भारतातल्या प्रत्येक नागरिकाला बहाल केली आहे. मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो, गरीब असो वा श्रीमंत असो, रिक्षा चालविणारा असो किंवा एखाद्या मर्सिडीजमधून आलिशान फिरणारा असो; या सर्वांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा

 भारताच्या संविधानाने दिला आहे. असे असताना जर एखादा रिक्षेवाला आपल्या राज्याचा मुख्यमंत्री होत असेल तर यात काय चुकीचे आहे. मात्र, ज्यांना हे खुपते त्यांना दुसर्‍याला टाकून बोलल्याशिवाय राहावत नाही. असेच काहीसे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे झाले आहे.

 

shinde 

 

 
 
 
काल Maharashtra CM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. उपमुख्यमंत्री त्यांना सांगत होते, थांबा थांबा! गाडीचा ब्रेक फेल झालेला... गाडी थांबते कशाला, ती सुटली ना सुसाट...'' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची टिंगल केली. इतक्या खालच्या स्तराला जाऊन एखाद्या पक्षप्रमुखाने मु'यमंत्र्यांच्या संदर्भात बोलणे निश्चितच चुकीचे आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामाचा धडाका सुरू केला आहे. प्रशासनाला निर्देश देणे, पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेणे याशिवाय राज्याच्या हितासाठी वेगवेगळे निर्णय घेणे यासारखी धडाकेबाज कामे मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केली आहेत. हीच संधी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनासुद्धा मिळाली होती. मात्र, मर्सिडीज चालवत फिरणार्‍या मु'यमंत्र्यांना गेल्या अडीच वर्षात ते जमलेच नाही आणि म्हणूनच आज रिक्षाच्या गतीपुढे मर्सिडीज फिकी पडली असल्याचे बोलून शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
 

मागील अडीच वर्षांत Maharashtra CM मु'यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या समस्या सोडविल्या असत्या, आमदारांच्या भेटी घेतल्या असत्या. त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या असत्या तर आज रिक्षाच्या गतीपुढे मर्सिडीजला गुडघे टेकावे लागले नसते. जितक्या बैठका मागील आठ दिवसांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी घेतल्या, तितक्या बैठका मागील अडीच वर्षांत घेतल्या असत्या तर आज कदाचित शिवसेनेची शकले पडली नसती. एखाद्या मुख्यमंत्र्याला त्यांच्या जुन्या व्यवसायावरून हिणवणे निश्चितच लाजिरवाणे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील चहावाला म्हणून हिणवले गेले. मात्र, मोदी यांनी देशाला बहुमताचे सरकार देऊन एक चांगले काम सुरू केले. या देशाच्या सर्वोच्च पदासाठी आदिवासी समाजातील सामान्य शिक्षिका द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या व्यक्ती त्यांच्या अंगी असलेल्या क्षमतेमुळे त्या पदापर्यंत पोहोचल्या आहेत.

 

Maharashtra CM एकनाथ शिंदेंनीदेखील सुरुवातीच्या काळात शिवसेनेसाठी रक्त सांडविले आहे. कुटुंबावर आलेल्या संकटांवर मात करीत समाजातील हिंदू बांधवांना न्याय देण्यासाठी रक्त आटवले आहे. आज निर्माण झालेल्या मतभेदामुळे बाजूला जाऊन शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यानंतर त्याच शिवसैनिकाला रिक्षावाला म्हणून हिणविले जात आहे; पण याच रिक्षावाल्याने मर्सिडीजचा टायर पंक्चर केला आहे, हे ठाकरे यांनी आतातरी स्वीकारण्याची गरज आहे. मु'यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातले बाहुले झाले होते. अडीच वर्षांच्या काळात त्यांना किमान महाराष्ट्रदेखील फिरता आले नाही. कधी कोरोना झाला तर कधी तब्येतीचे कारण तर कधी शस्त्रक्रिया झाली, अशा भावनिक बहाणेबाजीतच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द सुरू होती. मात्र, ठाकरे यांच्या या मिळमिळीत कारकीर्दीला सुरुंग लावून शिंदे यांनी महाराष्ट्राला न्याय देणारे सरकार स्थापन केले आहे.

 

एकनाथ शिंदे Maharashtra CM जर पक्ष सोडून गेले असते तर एकवेळ त्यांच्यावर होणारी टीका मान्य झाली असती. मात्र, शिवसेनेतच राहून त्यांनी बंड पुकारले आणि आपल्या विचाराला साजेसे सरकार आणले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बोचरी टीका करताना शिवसेनेच्या नेत्यांनी सांभाळून बोलण्याची गरज आहे. रिक्षावाला म्हणून हिणविणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या धडाडीचा अनुभव अख्या महाराष्ट्राने दोन दिवसांत घेतला तर अडीच वर्षांतील मर्सिडीजची गतीदेखील लोकांनी अनुभवली, हेही तितकेच खरे आहे. 

 
- नंदकिशोर काथवटे
 

- 9922999588