रावेर शौचालय घोटाळ्याप्रकरणी चौघे गजाआड

    दिनांक : 07-Jul-2022
Total Views |
रावेर : येथील पंचायत समितीतील स्वच्छ भारत अभियानाच्या दीड कोटी रुपयांच्या टॉयलेट घोटाळ्यात ६ जुलै रोजी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. सायंकाळी उशिरा पोलिसांनी पंचायत समितीचे अकाउंटंट लक्ष्मण दयाराम पाटील, रवींद्र रामू रायपुरे व नजीर हबीब तडवी (रा पाडळा बुद्रूक) व बाबूराव संपत पाटील ( विवरा बुद्रूक) या चौघांना अटक केली आहे.
 

Ghotala 
पोलिस निरीक्षक कैलास नागरे, उपनिरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील वंजारी, विकारुद्दीन शेख, अमोल जाधव, सुकेश तडवी, सचिन घुगे, सुरेश मेढे आणि समाधान ठाकूर यांच्या पथकाने अटक केली. अटक झालेले चौघेजण या घोटाळ्यातील अपहाराचे लाभार्थी आहेत. या चौघांच्या बँक खात्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अनुदानाची रक्कम वर्ग झाल्याचे आढळून आल्याने ही कारवाई केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून अडीच महिन्यानंतर ही पहिली कारवाई पोलिसांनी केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अनुदानाचा बेकायदेशीर लाभ घेतलेले सुमारे १२६ जण पोलिसांच्या कारवाईच्या टप्प्यात आहेत.