नाशिकमध्ये अफगाणी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या !

    दिनांक : 06-Jul-2022
Total Views |
नाशिक: नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आता येवला तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. काल राञी आठ वाजेच्या सुमारास अफगाण सुपी सय्यद नांवाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीनी गाेळ्या झाडुन हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे.
 
 
hatya
 
 
 
मुस्लिम अध्यात्मिक गुरुवर चार अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हत्येचे कारण समजू शकले नसल्याचे नाशिक पोलिसांनी सांगितले. मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर येवला शहरातील एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर ही घटना घडली. आर्थिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय व्यक्त केला आहे. तर घटनेच्या दरम्यान गोळीबाराचा आवाज आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत दोघांना पकडले मात्र चौघेजण यातून निसटले आहेत.
 
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ख्वाजा सय्यद चिश्ती असे मृताचे नाव असून, येवला येथील सुफी बाबा म्हणून ओळखले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सुफी बाबाची त्यांच्या एसयूव्ही वाहनात हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच नाशिकच्या Nashik येवला शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान माथुरे व इतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मुस्लिम धर्मगुरूला जखमी अवस्थेत शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नाशिक पोलिसांनी मुस्लिम धर्मगुरूच्या हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यासोबतच आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. याआधी, महाराष्ट्रातील अमरावती येथे गेल्या महिन्यात 21 जून रोजी केमिस्ट उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती, याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी मास्टरमाईंड शेख इरफान शेख रहीमसह अन्य 6 आरोपींना अटक केली आहे, ज्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांनी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तीनवेळा प्रयत्न केला आणि तिसऱ्यांदा ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.