पाटलीपुत्र एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला! वेळीच चूक लक्षात आल्याने टळला अनर्थ

    दिनांक : 26-Jul-2022
Total Views |
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनजवळील घटना... 
 
जळगावः पाटलीपुत्र एक्सप्रेसला (Pataliputra Express) मोठा अपघात होता होता टळला आहे. धावणाऱ्या रेल्वेचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेले तर रेल्वेचे अर्धे डब्बे मागेच राहिले. ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनजवळ (Waghali Railway Station) घडली आहे. मात्र हा प्रकार कसा घडाला याचे कारण अद्याप समोर आले नाही. रेल्वेच्या या झालेल्या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वेवाहतून दीड तास थांबवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर पाटलीपुत्र रेल्वे मागे घेऊन हे डब्बे जोडून रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.
 
 

apghat 
 
 
 
धावत्या एक्सप्रेसचे अर्धे डबे हे रेल्वे इंजिनबरोबर पुढे गेले
 
पाटलीपुत्र एक्सप्रेसला आज मोठा अपघात झाला असता मात्र वेळीच ही चूक लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. पाटलीपुत्र एक्सप्रेस चाळीसगाव मार्गे मुंबईला जात असताना या धावत्या एक्सप्रेसचे अर्धे डबे हे रेल्वे इंजिनबरोबर पुढे गेले तर तुटलेले मागे घेऊन ते पुन्हा जोडण्यात आले.
 
रेल्वे तीन किलोमीटर लांब गेली
 
त्यानंतर डब्यांचीही तपासणी करण्यात आली. मुख्य इंजिनबरोबर अर्धे डबे दोन ते तीन किलो मीटर लांब गेले होते, त्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
 
मार्गावरील रेल्वे दीड तास थांबल्या
 
पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेचे इंजिनला सर्वे डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.