अंमलबजावणी महासंचालनालय (ED and Sonia Gandhi) अर्थात ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले म्हणून देशभरात आंदोलन करणार्या काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे. आपल्या प्रत्येक कृतीने काँग्रेस पक्ष आत्मघातच करीत आहे. काँग्रेसला ना स्वत:ची चिंता आहे ना लोकशाहीची. गांधी घराण्याच्या दावणीला बांधलेला काँग्रेस पक्ष रसातळाला चालला असतानाही चुकांमधून काही शिकायचे सोडून चुकांची संख्या वाढवत चालला आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टी, रा. स्व. संघ यांना सांप्रदायिक ठरवायचे, त्यांना संविधानाचे धडे द्यायचे आणि दुसरीकडे तपास यंत्रणांच्या कामात अडथळे आणत संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवायची, ही (ED and Sonia Gandhi) काँग्रेसची नीती घातक अशीच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याविरुद्ध एसआयटीची चौकशी सुरू होती. कुठलाही लवाजमा न नेता ते स्वत:हून एसआयटी चौकशीला सामोरे गेले होते आणि नऊ तास त्यांची चौकशी झाली होती. अशा मोदींना हुकूमशहा म्हणणारी काँग्रेस आज कशी वागते आहे, हे देश पाहतो आहे. जर राहुल आणि सोनिया गांधी यांनी काहीच गैर केलेले नाही, तर मग घाबरण्याचे कारण काय? जा ना सामोरे चौकशीला! येऊ द्यात ना सत्य देशापुढे. निर्दोष असाल तर काही प्रश्नच नाही. पण, आरोप झाले आहेत, त्याची सत्यासत्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहे, तुम्ही चौकशीत सहकार्य केले तर फायदा तुमचाच आहे. पण, असहकाराची भूमिका घेत, चौकशीला बोलावल्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत रस्त्यांवर गोंधळ घालणारी काँग्रेस लोकशाही मूल्यांची जपणूक करीत आहे, असे म्हणता येईल काय? शेवटची घरघर लागली असताना प्रयत्नपूर्वक स्वत:ची अवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी (ED and Sonia Gandhi) काँग्रेसने आपली वाटचाल विनाशाच्या दिशेने सुरू ठेवली असल्याने आता साक्षात परमेश्वरही काँग‘ेसला वाचवू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
ईडीने (ED and Sonia Gandhi) चौकशीसाठी बोलावले तर काँग्रेसचे नेते म्हणतात की, ईडीने घरी जाऊन सोनियांचे बयाण नोंदवावे. सोनिया आणि राहुल गांधी हे संविधानापेक्षा आणि देशापेक्षा मोठे आहेत की काय? कशासाठी घरी जाऊन बयाण नोंदवायचे? काँग्रेसने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी; ती म्हणजे घटनेची पायमल्ली काँग्रेसच्या सरकारांनी जितक्या वेळा केली आहे ना, तेवढी तर कुणीही केलेली नाही. भाजपाने तर नाहीच नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणारी एक राष्ट्रभक्त संघटना आहे. असे असताना प्रत्येक वेळी भाजपावर टीका करताना काँग्रेसकडून संघालाही झोडपले जाते. काय आवश्यकता आहे याची? काहीच नाही. पण, जाणीवपूर्वक खोडसाळपणा करायचा, एका देशभक्त संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन करायचे आणि स्वत:ची राजकीय पोळी शेकायची व त्या मार्गे सत्ताकारण करायचे, हा काँग‘ेसचा गलिच्छ उद्योग देशातील जनतेनेच बंद पाडला आहे. तरीही (ED and Sonia Gandhi) काँग्रेस पक्ष सुधरायला तयार नाही. आता तर तो सुधारेल, याची अपेक्षाही नाही. शिवसेनेची काय अवस्था झाली आहे आपण पाहतोच आहोत. काँग‘ेसचाही असाच सत्यानाश झाल्याचे लवकरच पाहायला मिळेल, याची खात्री बाळगायला हरकत नाही.
देशातल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची अशी स्थिती होणे हे काळजी करायला लावणारे आहे. (ED and Sonia Gandhi) काँग्रेसच्या अशा स्थितीमुळे सामान्य कार्यकर्ते तर चिंतेत पडले आहेतच; बहुआयामी लोकशाही मानणारे सगळेच चिंतित झाले आहेत. आज काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा स्थितीत काँग्रेसने निडरपणे आत्मचिंतन करायला हवे. एकेकाळी या पक्षाला कुठलाही प्रतिस्पर्धी नव्हता. एकेकाळी बलाढ्य आणि मजबूत राहिलेल्या पक्षाची दयनीय व केविलवाणी अवस्था का झाली, याबाबत आत्मचिंतन करण्याची जबाबदारी काँग्रेसच्या सर्वच स्तरांतील नेत्यांनी स्वीकारली पाहिजे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे असू नये, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?
एकामागोमाग एक पराभव होत असतानाही काँग्रेसचे नेते सुधरायला तयार नाहीत. एकामागोमाग पराभवाचे झटके बसत असतानाही काँग्रेसच्या वर्तणुकीत, ध्येयधोरणात, नेत्यांच्या देहबोलीत कुठलाही फरक झाल्याचे आढळून आले नाही. (ED and Sonia Gandhi) काँग्रेसची काम करण्याची शैलीही बदलली नाही आणि विचारसरणी तर अजिबातच नाही. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीने तर काँग्रेसला पार रसातळाला नेले. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद न मिळण्याइतपत काँग्रेस कमकुवत झाली. तरीही या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, हे काँग्रेसला समजलेले नाही, उमगलेलेही नाही. उत्तरप्रदेशातील पराभवाने तर काँग्रेसचे कंबरडेच मोडले. 2009 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला उत्तरप्रदेशात 22 जागा मिळाल्या होत्या आणि समाजवादी पार्टीनंतर काँग्रेस दुसर्या क्रमांकावर होती. असे असतानाही 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हेच फक्त निवडून येऊ शकले. 2019 मध्ये तर राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव झाला. 2009 साली जी भाजपा चौथ्या क‘मांकावर होती, ती आज पहिल्या क‘मांकावर आहे आणि आज काँग्रेस चौथ्या स्थानी आहे.
काँग्रेसची (ED and Sonia Gandhi) ही परिस्थिती चिंता करायला लावणारी असली, तरी काँग्रेस संपून जाईल, भारत काँग्रेसमुक्त होईल, असा निष्कर्ष आजच काढणे घाईचे होईल. देशातील प्रत्येक राज्यात अन् प्रत्येक गावात काँग्रेसचे अस्तित्व आहे. कार्यकर्त्यांच्या मनात काँग्रेसला मानाचे स्थान आहे. देशातले जे व्यापक जनमानस आहे, त्यात काँग्रेस सामावलेली आहे, हे नाकारून चालत नाही. पण, आजही ज्या जनतेचा काँग्रेसवर भरवसा आहे, तो टिकवून ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांचीच आहे ना? पक्षात ज्या उणिवा आहेत, त्रुटी आहेत, त्या शोधून दुरुस्त कशा करता येतील, हे काँग्रेसच्या धुरिणांना बघावे लागेल. आत्मचिंतनात या सगळ्या बाबींचा समावेश करावा लागेल. आज आत आणि बाहेरही जे प्रश्न विचारले जात आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या हिताकडे दुर्लक्ष करून काँग्रेस फक्त तुष्टीकरणाचेच राजकारण करणार असेल तर काँग्रेसला कोणीही वाचवू शकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. बहुसख्यकांच्या भावभावनांकडे दुर्लक्ष कसे करता येईल? प्रत्येक राज्यातले राजकारण जर दिल्लीत बसलेले श्रेष्ठीच निश्चित करणार असतील तर राज्यातल्या नेतृत्वाला वाव कसा मिळणार? ते नेतृत्व विकसित होऊन पुढे कसे येणार, याचा विचार तरी करायला नको का? ज्या राहुल गांधींना प्रादेशिक राजकारणाचा अनुभव नाही, ते (ED and Sonia Gandhi) राहुल गांधी प्रादेशिक स्तरावरच निर्णय घेणार असतील तर पक्ष आणखी रसातळाला जाईल, हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही.
गेल्या 20 वर्षांत काँग्रेस पक्षात (ED and Sonia Gandhi) ज्यांनी नेतृत्व केले, ज्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत निर्णय घेतले, त्यांना काही प्रश्नांची उत्तरं तर द्यावीच लागतील ना? पक्षाची आज ही अवस्था का झाली, राज्याराज्यांत नवे नेतृत्व उदयास का आले नाही? काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीने पक्षाची अशी दयनीय अवस्था केली, असे म्हणायला त्यामुळेच वाव आहे. काहीही झाले की प्रदेशातले नेते दिल्लीत धाव घेत असत अन् प्रदेशातले काहीही माहिती नसलेली हायकमांड निर्णय देत असे. यामुळे अनेक पात्र नेत्यांवर अन्याय झाला आणि त्याच्या परिणामी पक्ष रसातळाला गेला. हे कोणाला अमान्य करता येईल? गेल्या काही वर्षांमध्ये देशातल्या जनतेचा मूड बदलला आहे; त्यांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत, हेही (ED and Sonia Gandhi) काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे. कोणताही पूर्वग‘ह न ठेवता उणिवा आहेत हे मान्य करणे, नव्या दमाच्या नेत्यांना संधी देणे, प्रादेशिक ताकद पुन्हा वाढविणे, सकारात्मक राजकारणावर भर देणे, याशिवाय काँग्रेसला गत्यंतर नाही. सारखे नकारात्मक राजकारण केले आणि भाजपावरच आसूड ओढण्यात काँग्रेसने धन्यता मानली तर पुढचा काळ त्या पक्षासाठी अधिक कठीण राहील. जनतेला विकास हवा आहे, जनतेला चांगले राहणीमान हवे आहे, जनतेला शांतता हवी आहे, याकडे काँग्रेसला लक्ष पुरवावे लागेल. आज जनतेच्या मनात स्थान निर्माण करणार्या मोदींनाच लक्ष्य करण्याची नीती काँग्रेसला यश मिळवून देणार नाही, हे त्या पक्षाच्या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. पक्षात संवाद वाढला पाहिजे आणि पक्षाने जनतेशी संवाद साधला पाहिजे. संवादातूनच प्रगतीचा मार्ग गवसणार आहे. पण, दुर्दैवाने (ED and Sonia Gandhi) काँग्रेस पक्ष संवादाकडे वळेल, अशी चिन्हे आज तरी दिसत नाहीत.ले.