स्टेट बँकेचे एटीएम फोडत चोरट्यांनी लांबविलेत 31 लाख

    दिनांक : 25-Jul-2022
Total Views |
बोदवड : धुळे जिल्ह्यातील फागणेसह कापडणे येथे एटीएम फोडल्याची घटना ताजी असतानाच बोदवड शहरातील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याने सराईत चोरटे हरीयाणा भागातून आल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे मध्यरात्री चोरी झाल्यानंतरही मुख्यालयाला (सर्व्हरला) संदेश गेला का नाही ? शिवाय गजबजलेल्या भागात चोरी होत असताना पोलिस प्रशासनाची गस्त का झाली नाही ? असादेखील प्रश्न आहे. 

atm 
 
 
पोलिस यंत्रणेची घटनास्थळी धाव
 
एटीएम फोडण्यात आल्याची घटना कळताच बोदवडचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व सहकाऱ्यांनी धाव घेतली तसेच जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली.