विरोधी ऐक्याची दाणादाण !Draupadi Murmu केवळ मोदींचा विरोध हाच कार्यक्रम

    दिनांक : 24-Jul-2022
Total Views |
 
प्रहार
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu यांचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीची चर्चा सुरू झाली, तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदी यांना घेरण्याचे मनसुबे आखले होते. Draupadi Murmu त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी पुढाकार घेतला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banrjee यांनीही बैठकी घेतल्या. अखेर सर्व विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांचे नाव निश्चित करण्यात आले. गेल्या काही महिन्यांमध्ये यशवंत सिन्हा यांची ओळख कडवे मोदीविरोधक अशी झाली होती. या प्रतिमेला अनुरूप अशाच कृती आणि विधाने यशवंत सिन्हा करीत होते. विशेषतः भाजपाचे नेतृत्व मोदींकडे गेल्यापासून यशवंत सिन्हा बिथरल्यासारखे, केवळ मोदींचा विरोध हा एकमेव कार्यक्रम घेऊन चालले आहेत. केवळ नरेंद्र मोदी Narendra Modi यांना विरोध करायचा म्हणून ते पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

murmu 
 
 
 
 
Draupadi Murmu मोदी यांना जर आक्रमकपणे विरोध नोंदवायचा असेल तर यशवंत सिन्हा हा उमेदवार योग्य राहील, असा विचार या सर्व विरोधकांनी केला. विशेष म्हणजे काँग्रेसनेसुद्धा मोदींच्या अंधविरोधातून यशवंत सिन्हा हाच विरोधकांचा एक मुख्य उमेदवार असण्याला मान्यता दिली. Draupadi Murmu आपल्या देशात गेल्या काही वर्षांत कायम पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणारे काही नेते आहेत. त्यामध्ये शरद पवार, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव अशी काही प्रमुख नावे. राष्ट्रपती निवडणुकीत हे सर्व अधिक सक्रिय झाले होते. याला दोन कारण आहेत. एक तर या निमित्ताने सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व कुणीही न देता स्वतःहून आपल्याकडे घ्यायचे व राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविण्यात पुढाकार घ्यायचा. Draupadi Murmu हे जरी सकृद्दर्शनी दिसत असले तरी प्रत्यक्षात डोळा भविष्यात पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यावर! ही विरोधी पक्षांचा नेता बनण्याची तीव्रता एवढी होती की, महाराष्ट्रात शरद पवारांनी बनवलेली महाविकास आघाडी आणि त्यांचे सरकार अस्तित्वासाठी संघर्ष करीत होते, तेव्हा शरद पवार मात्र आपल्या पंतप्रधान पदाच्या जुन्या स्वप्नाला गोंजारत नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकी घेण्यात गुंतले होते. Draupadi Murmu मात्र हा डाव पवारांच्याच अंगलट येऊ लागला होता. कारण ममता बॅनर्जी शरद पवारांनाच राष्ट्रपतिपदाचा उमेदवार बनवण्यासाठी आग्रह करीत होत्या. पवारांचे अनुयायीसुद्धा ‘साहेब राष्ट्रपती होणार' अशी खुशीची गाजरे खात होती. पवारधार्जिणी काही माध्यमे मोदी-पवार यांच्या संबंधांचा हवाला देत, आता पवारच राष्ट्रपती, असे चित्र रंगवीत होती.
 
मतदारसंख्या लक्षात घेता या निवडणुकीत एनडीएकडे झुकते माप असल्याने विरोधकांचा उमेदवार पराभूत होण्याची शक्यता जास्त होती. Draupadi Murmu शरद पवार यांना निवडणुकीत उभे करून पराभूत असा शिक्का लागला की पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील एक स्पर्धक बाद होईल, असा ममता बॅनर्जींसकट शरद पवारांना आग्रह करणा-या नेत्यांचा कयास होता. मात्र चतुर पवारांनी ही खेळी लक्षात घेऊन राष्ट्रपतिपदाचे पराभूत होणारे उमेदवार व्हायला सपशेल नकार दिला. Draupadi Murmu अखेर यशवंत सिन्हा यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आणि यशवंत सिन्हा यांच्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सर्वत्र जोर लावायचा आणि आक्रमक प्रचार करायचा, असे निश्चित केले गेले. Draupadi Murmu त्यामुळे या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला मोदी विरोधाची एक गडद किनार होती. त्याचबरोबर २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व मोदीविरोधक एकत्र करून तयारी करण्याकडे विरोधकांचा कल होता. Draupadi Murmu राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा याबरोबर देशभरातील सर्व विधानसभा सदस्य मतदान करीत असल्यामुळे देशाचा राजकीय कल कुणीकडे आणि किती आहे, याची जणू चाचणी होत असते.
 
भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांचा उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता होती. कारण आजवर भाजपाकडून अनपेक्षित नावे पुढे येत गेली आहेत. Draupadi Murmu तसे याही वेळा घडले आणि द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर झाली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा वनवासी क्षेत्रातील महिला राष्ट्रपती होण्याचा योग आला. त्यामुळे मुर्मू यांना मोठा प्रतिसाद मिळू लागला. कारण केवळ योग्य उमेदवार निवडून सगळ्या देशातील राजकीय विचारांची दिशा कशी बदलता येते, याचे प्रात्यक्षिकच मोदी यांनी दाखवून दिले आहे. Draupadi Murmu एनडीएला जेमतेम राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्याच्या जवळपास मते मिळतील, अशी निवडणूक जाहीर झाली तेव्हाची स्थिती! परंतु अनपेक्षित रीत्या द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu यांना उमेदवारी दिल्यानंतर देशातील राजकीय क्षेत्रातील वातावरण एकदम बदलले. एका आदिवासी महिलेला उमेदवार जाहीर केल्याने एनडीएमध्ये नसलेल्या अनेक पक्षांनी मुर्मू Draupadi Murmu यांना पाठींबा जाहीर केला. शिवसेना, तेलगू देसम, वाय. एस. आर. काँग्रेस, बिजू जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा अशा अनेक पक्षांनी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला. मोदी यांच्याविरोधात सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदीविरोधी वातावरण तयार करण्याचा विरोधकांचा डाव उधळला गेला.
 
Draupadi Murmu तो इतका उधळला की, राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांचा उमेदवार ठरवताना पुढाकार घेणा-या ममता बॅनर्जी यांनीच तटस्थ राहण्याची घोषणा केली. भाजपाने उपराष्ट्रपतिपदासाठी, ममता दीदींचा ज्यांना तीव्र विरोध आहे अशा धनकड यांना उमेदवारी दिली. विरोधकांनी मात्र काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा यांना उभे करण्याचे ठरविले तेव्हा ममता बॅनर्जींचा सल्ला घेतला नाही. तीव्र काँग्रेस विरोधामुळे, तटस्थ राहू, पण अल्वा यांना पाठींबा नाही, असे ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले. Draupadi Murmu त्यामुळे उमेदवार निवडून येणार नसला तरी विरोधी पक्षांच्या ऐक्याची मोट बांधून त्याचे नेतृत्व आपल्याकडे घ्यायचे आणि भविष्यात लोकसभा निवडणुकीत जर त्रिशंकू स्थिती आली तर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपले घोडे पुढे दामटायचे असा काही नेत्यांचा प्रयत्न होता. आता अशा प्रयत्नांना जबरदस्त खीळ बसली असून, ते मनसुबे उधळले गेले आहेत. Draupadi Murmu राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची अशी पंचायत का झाली, याचा विचार केला तर असे लक्षात येते की, विरोधकांचा विरोध हा द्वेषाने पछाडलेला आहे. त्यामध्ये प्रामाणिकता कमी आहे. विरोध करायचा म्हटले की काहीही विचार न करता जिथे-तिथे विरोध करायचा असे व्यवहारात चालत नसते. सिद्धांत आणि व्यवहार यांची सांगड घालावी लागते.
 
हिंदुत्वाचा द्वेष करायचा म्हणून हिंदुत्ववादी पक्ष, हिंदुत्ववादी नेत्यांना डोळे झाकून शक्य तेथे विरोध करणे अयोग्य आहे. Draupadi Murmu जेव्हा देशातील जनता मोठ्या संख्येने हिंदुत्ववाद स्वीकारते आहे, जीवनामध्ये आचरणात आणत आहे, तेव्हा विनाकारण हिंदुत्व नाकाराचे असे डावपेच कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊच शकत नाहीत. त्याचबरोबर पुढचा विषय आहे राजकीय अस्पृश्यतेचा. Draupadi Murmu भारतीय जनता पक्ष म्हटले की अंगावर पाल पडल्याप्रमाणे किंचाळत ‘आमचा विरोध आहे. आम्हाला कुणीही चालेल, पण भारतीय जनता पक्ष नको' अशी एक राजकीय अस्पृश्यता या देशातील तथाकथित डाव्या आणि पुरोगामी यांनी तयार केली होती. Draupadi Murmu मात्र नंतर देशात आघाड्यांचा काळ आला आणि वेगवेगळे पक्ष बहुमतासाठी एकत्रित येऊन सरकार बनवण्याचा सिलसिला सुरू झाला. भारतामधील प्रादेशिक विविधता, अस्मितांची विविधता यामुळे जनादेशसुद्धा वेगवेगळ्या पातळींवर वेगवेगळ्या संख्येने प्रकट होऊ लागला. Draupadi Murmu अशा काळात राजकीय अपरिहार्यता अशी तयार होते की त्यात राजकीय अस्पृश्यतेचा विचार कुठल्या कुठे उडून जातो.
राजकीय अपरिहार्यतेमुळे इंदिरा गांधींना विरोध करायचा म्हणून भाजपा आणि समाजवादी एकत्र येणे, लालूप्रसाद यांना विरोध करायचा म्हणून भाजपा आणि पासवान एकत्र येणे, अशा तडजोडी करण्याची वेळ येते. Draupadi Murmu त्यामुळे राजकीय अस्पृश्यता हा आता व्यवहारामध्ये उपयुक्त विषय राहिलेला नाही. नंतर त्याच्या पुढे जाऊन व्यक्तीचा टोकाचा द्वेष आणि त्या व्यक्तीविरोधात इतरांना एकत्र आणणे सुरू झाले. राजकारण असल्या व्यक्तिद्वेषाच्या डावपेचांच्या पलीकडे गेले आहे. Draupadi Murmu हिंदुत्वाचा विरोध, राजकीय अस्पृश्यता म्हणून भाजपाचा विरोध आणि नरेंद्र मोदींचा द्वेष म्हणून मोदी विरोध, या गोष्टींमुळे विरोधी पक्षांनी सतत डावपेच खेळले. Draupadi Murmu आता सुद्धा राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत या तिन्हीही मुद्यांना धरून सत्ताधारी पक्षाला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा हट्ट होता. नरेंद्र मोदींनी असा काही उमेदवार दिला की, उमेदवारीनेच अर्धी लढाई जिंकून टाकली.
 
Draupadi Murmu द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी जाहीर झाली आणि विरोधकांमध्ये चलबिचल सुरू झाली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा वनवासी क्षेत्रातील एक महिला राष्ट्रपतिपदाच्या उच्चतम भूमिकेत दिसणार, याचे कौतुक सर्व दूर प्रत्येकाच्या मनात होत गेले आणि मुर्मू Draupadi Murmu यांना मिळणारा प्रतिसाद वाढतच गेला. मतदानानंतर जे आकडे समोर आले आहेत, ते पाहता ब-याच राज्यांत भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. अगदी केरळमध्येसुद्धा एक मत मुर्मू यांना मिळाले आहे. कुठेही वैचारिक धोबीघाट सुरू करून राजकीय धुणी धुणा-या विरोधकांना फटका बसला. Draupadi Murmu कोठेही राजकीय अस्पृश्यता निर्माण करीत भाजपाची कोंडी करू पाहणा-यांना खीळ बसली. Draupadi Murmu जिथे-तिथे मोदींना विरोध करायचा म्हणून राजकारण करणा-या देशातील सर्व राजकीय पक्षांची, केवळ एक योग्य उमेदवार ठरवून नरेंद्र मोदी यांनी दाणादाण उडवली आहे.
 
- दिलीप धारूरकर