धक्कादायक ! झेलम एक्स्प्रेसमध्ये धावत्या रेल्वेत १४ वर्षीय अनाथ मुलीवर बलात्कार

    दिनांक : 24-Jul-2022
Total Views |
जळगाव तभा : झेलम एक्स्प्रेसमध्ये रेल्वेच्या पॅंट्री कारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १४ वर्षीय अनाथ मुलीवर . पुणे जीआरपीने गुरुवारी तिघांना बलाल्ताकरप्रकरणी अटक करत त्यांची चौकशी सुरु केली. पॅन्ट्री कारमधील एका कर्मचााऱ्याने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Rape news) केला तर इतर दोघांनी त्याला साथ दिली असल्याचं समोर आलं आहे. 19 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 मिनिटांची बलात्काराची ही घटना घडली ही मुलगी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्याला रेल्वे प्लॅटफॉर्मवर रडताना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. भुसावळ रेल्वे पोलिसांनी या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पुणे जीआरपीने तिघांना अटक करत त्यांची चौकशी सुरु केली.
 
 

rape 
 
 
घटनेचे सविस्तर वृत्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी विनातिकीट झेलम एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होती. ती एका एसी कंम्पार्टमेन्टमध्ये असताना तिची पॅन्ट्रीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने चौकशी केली. तुला टीसीकडे देईन, अशी भीती घालत कर्मचारी तिला पॅन्ट्री कारमध्ये घेऊन गेला. तिथे नेत त्यानं तिला जेवणं देतो, असं म्हणत भूलही लावली. यानंतर तिच्यावर पॅन्ट्रीत हैवानी कृत्य केलं. त्यादरम्यान, तिथे इतर दोन कर्मचारीही होते. पण त्यांनीह त्याला रोखण्याचाही प्रयत्न केला नाही. यानंतर पीडितेला भुसावळ रेल्वे स्थानकात उतरवण्यात आलं.
ही मुलगी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्याला रेल्वे फलाटावर रडताना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. का रडते? असे विचारले असता, मुलीने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) च्या कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर भुसावळ जीआरपीकडून पुणे जीआरपी पथकाला कळवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचा गणवेश, त्यांची चेहरापट्टी याच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर हे आरोप घोरपडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनीहा सगळा परिसर पिंजून काढत अखेर बलात्कार प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता त्यांची चौकशी केली जात आहे . पोलिसांकडून आता पुढील तपास सुरु आहे.