राज्यात शिंदे गटाचा 'पहिला सरपंच होण्याचा मान मिळाला कुसुंबा ग्रामपंचायतीला !

    दिनांक : 23-Jul-2022
Total Views |
जळगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेसोबत (Shiv Sena) बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटानं पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत (BJP) मिळून राज्यात सरकार देखील स्थापन केलं आहे.
 
 
 

shinde1 
 
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर, राज्यात शिंदे गटाचा 'पहिला सरपंच' होण्याचा मान जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील कुसुंबा ग्रामपंचायतीला मिळाला आहे. . कुसुंबा ग्रामपंचायतचे (Kusumba Gram Panchayat) माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या नेतृत्वात झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत यमुनाबाई हिलाल ठाकरे (Yamunabai Thackeray) या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. या पहिल्या निवडीमुळं शिंदे गटातील आमदारांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. 
 
दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. त्यातच आता बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटासाठी एक दिलासादायक बातमी आहे. एका बाजूला शिवसैनिकांचा रोष सुरु असताना दुसरीकडं जळगाव जिल्ह्यानं एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे.