मोठी बातमी... उच्च न्यायालयाचे आदेश येताच मुक्ताईनगरात जळगाव जिल्हाधिकारी निवड प्रक्रियेला स्थगिती !

    दिनांक : 22-Jul-2022
Total Views |
शिंदे गटातील राज्यातील पहिला नगराध्यक्ष मुक्ताईनगररून होण्याचे स्वप्न भंगले : राजकीय गोटात खळबळ
 
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपालिकेत आमदार समर्थक पियुष मोरे यांची शुक्रवार, 22 रोजी निवड निश्‍चित असल्याचे मानले जात असतानाच उच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी निवड प्रक्रियेला स्थगिती दिल्याने राजकीय गटात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पियुष मोरे यांच्या माध्यमातून राज्यातील शिंदे गटाचा पहिला नगराध्यक्ष निवडीचा मान मुक्ताईनगरला मिळणार होता मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे काही दिवस प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे. या संदर्भात न्यायालयाच्या आदेशाने निवड प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे भुसावळातील प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
 
 

court
 
 
 
 
 
नगराध्यक्ष निवडीला तात्पुरती स्थगिती
 
मुक्ताईनगरच्या तत्कालीन नगराध्यक्ष नजमा तडवी यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आले होते. त्यांच्या जागेवर कोणी महिला उमेदवार नसल्यामुळे एसटी या प्रवर्गातून निवडून आलेले पियुष मोरे महाजन यांची या पदावर वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. नगराध्यक्ष पद निवडीच्या शेवटच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे शुक्रवारी केवळ त्यांच्या निवडीची औपचारीकता उरलेली होती. मात्र नगराध्यक्षपद निवडीसाठी अवघे काही तास उरले असताना उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला तात्पुरता स्थगिती दिली आहे.
 
पियुष मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे राज्यातील पहिले नगराध्यक्ष बनणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र न्यायालयाने प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे आता पुढे नगराध्यक्ष निवडीबाबत नेमके काय आदेश होतात? याकडे लक्ष लागले आहे.
विहित करारापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन : भुसावळ तहसीलदारांनी आयुष प्रोकॉन कंपनीला सुनावला 75 लाखांचा दंड