शाहू नगर परिसरात रेल्वे ट्रॅक दरम्यान गटारीत आढळला तरुणाचा मृतदेह खून झाल्याचा संशय

    दिनांक : 20-Jul-2022
Total Views |
 
 
जळगाव :शहरातील खुनाचे सत्र काही संपण्याचे नांव घेत नाही शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील ते रेल्वे ट्रॅक दरम्यान असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा असे मयताचे नांव आहे . जवळच रक्त आणि काही दगड पडलेले असल्याने तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले आहेत.
 
 

khun 
 
 
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारा रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. बुधवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह जळकी मीलजवळ असलेल्या गटारीत मिळून आला. रेल्वे ट्रॅकला लागूनच असलेल्या गटारीत रमाचा मृतदेह उलटा पडलेला होता तर जवळच रक्त आणि काही दगड पडलेले होते.
 
घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, SP चंद्रकांत गवळी हे पथकासह पोहचले आहेत. मयताच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. दरम्यान, रहीम शहा याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून दुपारी त्याला तीन तरुणसोबत घेऊन गेले होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.