जळगावात रस्ते गेले खड्ड्यात, रस्त्यासाठी नागरिक रस्त्यावर

    दिनांक : 19-Jul-2022
Total Views |
दूध फेडरेशन परिसरात रोको आंदोलन
 
जळगाव : शहरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था होऊन खड्डेमय झाल्याने, नागरिक, वाहनचालक हैराण झाले. तसेच लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यातच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरातील मुख्य रस्ता त्यासह परिसरातील रस्त्याची गेल्या चार वर्षांपासून गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यासाठी येथील नागरिकांनी इंद्रप्रस्थ नगर येथून मोर्चा काढून एस. के. ऑईल मिल जवळील मुख्य चौकात रस्ता रोको करून महापालिका प्रशासनाचा व नगरसेवकांचा निषेध नोंदविला.
 
Jalgaon Road
 
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरात 'रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी नेहमी महापौर व आयुक्त यांना निवेदन व त्याचा पाठपुरावा हि केला. परंतु कुठलेही नियोजन मनपा प्रशासन करीत नसल्याने नागरिकांनी एकत्र येऊन मंगळवारी नागरिकांनी हे रास्ता रोको आंदोलन केले.
 
चार दिवसात काम सुरु करू - महापौर
 
रास्ता रोको सुरु असतात घटनास्थळी शहर पोलीस पथकही दाखल झाले होते. नागरिकांच्या संतप्त भावना पोलीस प्रशासनाने एकूण घेतल्या. त्यानंतर महापौर जयश्री महाजन या आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी नागरिकांशी चर्चा करत पुढील ४ दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन देत हे आंदोलन तूर्तास मागे घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या मागणीस प्रतिसाद देत नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
 
यांनी केले आंदोलन
 
आकाश जाधव, विजय सुरवाडे, संदीप महाले, दीपक झुझारराव, नितीन मोरे, अतुल शिरसाळे, स्वामी पोतदार, महेश ठाकूर, अमर लोखंडे, नारायण कोळी, कुमार निकम, राजू मोरे, बंटी सोनवणे, भूषण राऊत, लक्षिमकांत तिवारी, चंद्रमणी मोरे आदी नागरिक उपस्थित होते.