जळगावच्या वैद्याच्या तीन संशोधनावर पेटंटची मोहोर; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम

    दिनांक : 17-Jul-2022
Total Views |
जळगाव : येथील वैद्य श्रीरंग छापेकर यांना तीन पेटंट मिळाले असून यात दोन भारत सरकारचे प्रॉडक्ट निर्मिती बद्दल तर एक ऑस्ट्रेलिया सरकारचा नाविन्यपूर्ण संशोधनात्मक निर्मितीचे पेटंट आहे. एकाचवेळी तीन पेटंट खान्देशात मिळवणारे वैद्य श्रीरंग छापेकर हे पहिलेच वैद्य ठरले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

patent 
 
ऑस्ट्रेलिया सरकारचे पेटंट हे अल्ट्राव्हायोलेट डिसइन्फेक्टंट चेंबरच्या संशोधनात्मक निर्मितीबद्दल मिळालेले आहे. आयुर्वेदात औषधासाठी वापरल्या जाणार्‍या वनस्पती, पावडर, चूर्ण यांमध्ये बुरशी व जंतूसंसर्ग होऊ नये, त्या दीर्घकाळ सुरक्षित राहाव्यात आणि त्यांची परिणामकारकता वाढावी यासाठी हे अल्ट्राव्हायोलेट चेंबर बनवण्यात आले आहे. या चेंबरमध्ये 360 अंशातून अल्ट्राव्हायोलेट किरणे पडत असल्याने त्यांचा केवळ पृष्ठभागाशी संबंध न येता त्या चेंबरमध्ये ठेवलेल्या सर्व पदार्थांवर परिणाम होतो.
 


Shreerang 
 
लाल तांदूळ व हिरवे मूग यांचे सूप यांना आयुर्वेदात पेया, यूष असे म्हटले जाते. या दोन्हींपासून रेडी टू सर्व्ह बनवलेल्या या दोन्ही सूप ना पेटंट मिळाले आहे. यात आयुर्वेद शास्त्रानुसार पाचक घटकांचे मिश्रण आहे. आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी हलका व पौष्टिक आहार देणे गरजेचे असते. गर्भिणी व प्रसूत माता तसेच सहा महिन्यांवरील बालक यांच्यासाठीही पौष्टिक आहाराची गरज असते. पंचकर्मात व पंचकर्मानंतरदेखील हे सूप वापरता येते. सर्वसामान्य नागरिक देखील हे पेया व यूष सूप घेऊ शकतात. हिरव्या मुगाचे सूप व लाल तांदळाचे सूप या दोन्ही प्रॉडक्ट ना भारत सरकारने पेटंट दिले आहे.