'ग्लोबल टीचर'चा राजीनामा

    दिनांक : 14-Jul-2022
Total Views |
 
वेध
परितेवाडी हे Global teacher सोलापूर जिल्ह्यात असलेलं जेमतेम दोन हजार लोकवस्तीचं छोटसं गाव. या गावातील जिल्हा परिषदेची शाळा 3 डिसेंबर 2020 रोजी जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.
 
 

dislay
 
 
 
याला कारणीभूत होते येथील 32 वर्षीय शिक्षक रणजितसिंह डिसले. 'ग्लोबल टीचर' Global teacher पुरस्कार स्पर्धेत डिसले गुरुजी 140 देशातल्या 12 हजार शिक्षकांमधून पहिल्या 10 मध्ये आणि नंतर पहिल्या क'मांकावर पोहोचले होते. युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनद्वारा 'ग्लोबल टीचर' पुरस्काराची घोषणा एका आभासी समारोहात जगप्रसिद्ध अभिनेता स्टीफन फ्राई याने केली. 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 7 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा पुरस्कार परितेवाडीच्या जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना घोषित झाला. त्यानंतर डिसले गुरुजी आणि त्यांनी मिळविलेला Global teacher पुरस्कार याची जगभर चर्चा झाली. या पुरस्काराने प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला.
 
दुर्लक्षित, उपेक्षित आणि संसाधनांची उणीव असलेल्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करीत Global teacher डिसले गुरुजींनी 'क्विक रिस्पॉन्स' अर्थात क्युआर कोड प्रणालीचे संशोधन केले होते. पाठ्यक्रमातील धडे क्युआर कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजतेने उलगडतील, अशी रचना त्यांनी केली. क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर ध्वनिफीत, चित्रफीत तथा विविध गोष्टींच्या माध्यमातून पाठ्यक्रम विद्यार्थ्यांसमोर येत होता. प्रोजेक्टरच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना अभ्यासक'माचे सहज, सुलभ धडे या संशोधनानंतर गिरविता येत होते. त्यांच्या या संशोधनालाच जागतिक स्तरावरील 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळाला. भारतात असा पुरस्कार मिळविणारे ते पहिले शिक्षक ठरले. पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कार राशीतील अर्धी रक्कम त्यांनी त्यांच्यासह अंतिम फेरीत पोहोचलेल्या 9 शिक्षकांना वितरित केली. यावेळी त्यांनी मला जरी पहिला पुरस्कार मिळाला असला, तरी उर्वरित 9 जणांची संशोधने विद्यार्थी उपयोगी आहेत. शिक्षक नेहमी देण्यावर विश्वास ठेवणारा असतो, असे म्हणत Global teacher पुरस्काराची रक्कम उर्वरित 9 शिक्षकांंमध्ये वितरित केली. त्यावेळी पुन्हा भारतीयांची छाती गर्वाने फुलली.
 
रणजितसिंह डिसले Global teacher यांचे जगभर कौतुक झाले. मुख्यमंत्र्यांनीही कौतुक करीत त्यांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. रणजितसिंह डिसले यांची त्यानंतर जागतिक बँकेने बँकेचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली. जागतिक बँकेच्या वतीने शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाकरिता समिती गठित केली. त्या समितीत ही नियुक्ती होती. या सर्व घटनाक्रमापर्यंत सर्व ठीक असतानाच अचानक माध्यमांसमोर येत डिसले गुरुजींनी अमेरिकेतील सरकारकडून संशोधनाकरिता दिली जाणारी प'तिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप त्यांना घोषित झाली असून सहा महिन्याची रजा घेऊन अभ्यासाकरिता अमेरिकेत जाऊन पीएचडी करावयाची आहे. मात्र, गत दीड महिन्यांपासून प्रयत्न करूनही रजा मिळत नसल्याचे सांगितले. त्यानंतरही त्यांना सर्वत्र सहानुभूती मिळाली. थेट शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत त्यांना रजा देण्याचे आदेश दिले. पण दुसरीकडे Global teacher डिसले गुरुजींवर प्रशासनातील शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी अनेक आक्षेप घेतले. यात रजेच्या अर्जातील त्रुटीपासून ते आंतरराष्ट्रीय पुरस्काराचा, संशोधनाचा विद्यार्थ्यांना फायदा काय झाला, अशा अनेकानेक बाबी चर्चेत येऊ लागल्या.
 
गत दोन वर्षांत रणजितसिंह डिसले Global teacher यांची 'डाएट' अर्थात जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था योजनेंतर्गत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ते प्रत्यक्षात हजर नसल्याचाही दावा करण्यात आला. त्यांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले; यासह इतर आरोप करीत प्रशासनाने चौकशी समिती नेमली. आता या चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच डिसले यांनी राजीनामा दिला आहे. खरं म्हणजे वैयक्तिक प'तिभेतून शाळेचे, गावाचे व जिल्ह्यासह देशाचे नाव उंचाविणार्‍या व्यक्तीने राजीनामा देणे हे नेमके कुणाचे अपयश आहे? त्याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. प्रशासनातील असूया याला कारणीभूत असेल तर यानंतर कोणीही डिसले गुरुजींच्या पावलांवर मार्गक'मण करण्याची हिंमत करणार नाही. पण डिसले गुरुजींनी पुरस्काराचा अहं बाळगत त्यांच्या नियमित कर्तव्यात कुचराई केली का? ज्या विद्यार्थी हितासाठी त्यांचा जागतिक Global teacher गौरव झाला त्या विद्यार्थी हिताचे त्यांना विस्मरण झाले का? हे प्रश्नही अनुत्तरित असताना चौकशी समितीला सामोरे जात दोषी नसल्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा राजीनामा संशय निर्माण करणारा आहे. एवढंच.
 
- नीलेश जोशी
 
- 9422862484