नागरिकांनो सावधान.. बंद घरावर चोरट्यांचा डोळा

    दिनांक : 13-Jul-2022
Total Views |
धांडेनगरातील बंद घर फोडून ४ लाख ६१ हजारांचा ऐवज लंपास
 
जळगाव : घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. नातेवाईकांकडे बाहेरगावी गेलेल्या जळगाव येथील धांडेनगर, श्रद्धाकाॅलनी कुटुंबियांचे बंद घर फोडून चोरट्याने हैदराबादी हार, मोत्यासह सान्याचे दागिने असा 4 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. 12 जूलै रोजी ही घटना उघडकीस आली. बुधवारी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
 
Gharphodi
 
सतीष मोरेश्वर जोशी (वय 55, रा. धांडेनगर, श्रद्धा कॉलनी) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. घटना अशी की, जोशी हे कुटुंबियांसह 7 जूलै रोजी बडोदा (गुजरात) येथे काकांकडे गेले होते. यानंतर ते 11 जुलैला नाशिक येथे गेले त्यानंतर 12 जुलैला ते जळगावात पोहोचले.
 
जोशी घरी परतले तेव्हा त्यांच्या घराचे कपाऊंडचे गेट खुले दिसले तसेच दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला होता. आतील बेडरुमधील दोन कपाटे देखील खुली होती. सामान अस्ताव्यस्त पडलेले पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
 
यानंतर जोशी यांनी दागिने ठेवलेली बॅग तपासली. यावेळी सोन्याचे मंगळसुत्र, दोन पाटल्या, चार बांगड्या, नेकलेस, 15 ग्रॅम वजनाचा तुकडा, दोन अंगठ्या, कानातल्या रिंग, दोन गोफ, दोन चेन, चांदीचा गणपती, छुमछुम व मुकुट, चांदीचे ब्रेसलेट, चांदीचे पळी, ताम्हण व वाटी, हैद्राबादी मोत्याचा हार, अमेरीकन डायमंड सेट, तीन मोत्याचे हार, सोन्याच्या बाळ्या, जिवटी व सहा हजार रुपये रोख असा 4 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवल्याचे समोर आले.
 
ही घटना उघडकीस आल्यानंतर जोशी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रोहीदास गभाले तपास करीत आहेत.