पॅरोलवरील सहा आरोपी नॉट रिचेबल

    दिनांक : 12-Jul-2022
Total Views |
जळगाव : अभिवचन रजेवर नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेले जिल्ह्यातील सहा कैदी नॉट रिचेबल झाले आहे. त्यांचा शोध जळगावात सुरू आहे.
 
 
Farar
 
नाशिक कारागृहाचे कर्मचारी सुर्यकांत विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या सहा जणांच्या विरोधात संबधित पोलिस ठाण्यांमध्ये मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या फरार झालेल्या कैद्यांमध्ये पिंटु उर्फ संजय रामलाल गायकवाड (करमाड, ता. जामनेर), दिलीप सुकदेव गायकवाड (रा. वाघारी, ता. जळगाव), गोविंद मुलचंद राठोड (वय 45, रा. कुंभारीतांडा, ता. जामनेर), इश्वर एकनाथ कोळी (वय 30, रा. शेंदूर्णी, ता. जामनेर), गोविंदा सुरेश मालचे (रा. केवडीपुरा, ता. एरंडोल) व हसरत देवराम साबळे (रा. माळपिंप्री, ता. एरंडोल) यांचा समावेश आहे.