जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. केतन ढाके

    दिनांक : 10-Jul-2022
Total Views |
जळगाव : जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदासाठीच्या चौरंगी लढतीत विशेष सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी तर उपाध्यक्षपदी ॲड. वैशाली महाजन यांनी बाजी मारली.
 

Adv Ketan Dhake 
जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सुमारे ८७ टक्के मतदान झाले होते. त्यात १ हजार ४० पैकी ९०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवड प्रक्रियेची मतमोजणी शनिवारी झाली. यात सर्वांचे लक्ष अर्थातच अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले होते. यात अध्यक्षपदासाठी विशेष सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांच्यासह किशोर भारंबे, सागर चित्रे व स्वाती निकम यांच्यात लढत झाली. यात केतन ढाके यांनी बाजी मारली असून त्यांना ४७६ मते मिळाली. या निवडणूक प्रक्रीयेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. दिलीप मंडोरे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. संग्राम चव्हाण, योगेश महाजन, ॲड. हेमंत भंगाळे, ॲड. कालिंदी चौधरी यांनी काम पाहिले.
तसेच सचिव : स्वप्निल पाटील, सहसचिव : देवता पाटील, कोषाध्यक्ष : विशाल घोडेस्वार, सदस्य : निखील पाटील, दीपक वाघ, हर्षल देशमुख, खुशाल जाधव, अजय पाटील, नीलेश जाधव, हेमंत गिरनारे, विवेक पाटील, दीपाली भावसार, शितल राठी आदींची निवड झाली आहे.