नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले

    दिनांक : 09-Jun-2022
Total Views |

वेध


माओवाद्यांच्या कारवायांमुळे देशातील काही जिल्हे त्रस्त होते. Naxal movement नक्षल्यांच्या घातपाती कारवायाने अनेक जिल्ह्यांचा विकास खोळंबला होता.

 
 
 
 
nakshal

 

 
 
 
गडचिरोलीसारखा नैसर्गिक द़ृष्टीने श्रीमंत असलेला जिल्हा केवळ नक्षलवादामुळे मागील 40 वर्षांपासून मागासलेपणाच्या काळ्या यादीत पोहोचला होता. मात्र, मोदी सरकारच्या कार्यकाळात Naxal movement नक्षल चळवळीचे कंबरडे मोडण्यात प्रशासनाला यश आले आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या मोदी सरकारच्या कार्यकाळात 70 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: दिली आहे. केंद्रात मोदींचे सरकार आल्यापासून आतापर्यंत नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये बरीच घट दिसून आली असून पूर्वीच्या काळात नक्षल हिंसाचाराच्या मोठ्या प्रमाणात घटना व्हायच्या. मात्र, दुर्गम भागात विकासाची कामे होऊ लागल्याने व तरुणांच्या हाताला काम मिळू लागल्याने नक्षलग्रस्त भागातील हिंसाचाराला आळा घालता येऊ शकला. पोलिसांनी नक्षलग्रस्त भागांमध्ये शासनाच्या योजना पोहोचविल्या. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यासाठी केंद्रीय गृह खात्याने प्रत्येक जिल्ह्याला भरघोस निधी दिला. दुर्गम भागात Naxal movement नक्षलविरोधी अभियानावर असणार्‍या अधिकार्‍यांना, पोलिस जवानांना लागणार्‍या सोयी-सुविधा तातडीने पुरविण्यात आल्या. त्यांच्या अडचणी दूर करण्यात आल्या. यामुळे नक्षलग्रस्त भागातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

निश्चितच त्यांच्या कामात प्रगती दिसून आली. लोकांचा पोलिस प्रशासनावरचा विश्वास वाढला. त्यामुळे आपसूकच देशभरातील Naxal movement नक्षल चळवळीला मिळणारे जनतेचे सहकार्य कमी झाले. लोकांनी नक्षल चळवळीकडे पाठ फिरविली. या चळवळीचे आता कंबरडे मोडले असल्याचे जाणवू लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात फोफावलेला नक्षलवाद गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे. या जिल्ह्यात आलेल्या काही कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍यांमुळे दुर्गम भागातील लोकांच्या अडचणी दूर झाल्या. त्यांचा पोलिसांप्रती विश्वास वाढला. त्यामुळे नक्षल चळवळीची पाळेमुळे खिळखिळी झाली आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक राजवर्धन, गिरीश जैन, राजेश प्रधान, वीरेश प्रभू, सुवेझ हक, संदीप पाटील यासारख्या अधिकार्‍यांनी Naxal movement नक्षल चळवळीविरोधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनीसुद्धा 'दादालोरा खिडकी'च्या (पोलिस दादाची खिडकी) माध्यमातून दुर्गम भागातील आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या मुलांना रोजगाराचे प्रशिक्षण दिले. यामुळे जवळपास 2737 युवक प्रशिक्षण घेऊन रोजगार करण्यासाठी मुख्य प्रवाहात उतरले आहेत. याशिवाय पोलिसांनी युवक-युवतींसाठी महारोजगार मेळावे आयोेजित केल्याने 2473 तरुणांना पोलिसांच्या पुढाकारातून नोकर्‍या मिळाल्या आहेत. यासारख्या उपक्रमांमुळे जनतेचे पोलिसांना सहकार्य मिळत असून नक्षल्यांना मात्र जनता नाकारू लागली आहे.

 

गडचिरोली पोलिसांसमोर नुकतेच 12 लाखांचे बक्षीस असलेल्या दोन Naxal movement नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आतापर्यंत या वर्षात एकूण 49 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. आत्मसमर्पण करण्यात आलेल्या नक्षल्यांनी नक्षल चळवळीतील जाचाला कंटाळून आत्मसमर्पण करीत असल्याचे म्हटले आहे. Naxal movement नक्षल चळवळीतील वरिष्ठ नक्षल सदस्य कनिष्ठ सदस्यांकडे दुर्लक्ष करतात. चळवळीत आलेला पैसा केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी वापरतात. आपल्या आरोग्याकडेसुद्धा आम्हाला वेळ देता येत नाही. आमच्यावर बंधने लादली जातात. यासारखी असंख्य कारणे देत आपण पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून पुढील आयुष्य समाजातील इतर लोकांप्रमाणे घालविणार असल्याचे आत्मसमर्पित नक्षल्यांनी म्हटले आहे. हिंसेचा त्याग करून आत्मसमर्पण करा, असे आवाहन प्रशासनाने केल्यानंतर त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक नक्षलप्रभावित जिल्ह्यातील नक्षल्यांनी नक्षल चळवळीला रामराम ठोकला आहे. त्यामुळे नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 70 टक्क्यांनी घटली आहे. ही बाब नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील जनतेसाठी, तसेच संबंधित राज्यांसाठी निश्चितच आनंदाची आहे.

 
- नंदकिशोर काथवटे
 

- 9922999588