RSS ची कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गुन्हा दाखल

    दिनांक : 07-Jun-2022
Total Views |
लखनऊ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सहा कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा लखनऊमधील माडियाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. सुलतानपूरमधील एका पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला लखनऊमधील अलीगंज, उन्नावमधील नवाबगंजसह कर्नाटकातील 4 ठिकाणी असलेले RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा संदेश मोबाईलवर पाठवण्यात आला आहे. ही धमकी तीन भाषांमध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर टीमने तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर एटीएस आणि इतर गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत.
 
 

rss1 
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 8 वाजता लखनऊ आणि उन्नाव येथील युनियन ऑफिसला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या लिंकद्वारे ही धमकी देण्यात आली होती. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
दरम्यान, हे सगळे मेसेज अलीगंज येथे राहणाऱ्या नीळकंठ मणी पुजारींना पाठविले गेलेत . यामध्ये लखनऊ, उन्नावमधील नवाबगंज आणि कर्नाटकातील चार ठिकाणी संघाच्या कार्यालयांचा समावेश आहे. धमकीचा मॅसेज प्राप्त होताच नीलकंठ तिवारी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
 
डॉ नीळकंठ पुजारी हे सुलतानपूर येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर आहेत. ते अलीगंज येथील RSS बरोबर देखील जोडले गेलेले आहेत. तसेच आरएसएसचे जुने स्वयंसेवक आहेत. रविवारी (5 मे) रात्री त्यांना एका परदेशी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. त्यात हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत. तुमचे सहा पक्ष कार्यालय बॉम्बने उडवले जाईल. शक्य असल्यास, स्फोट थांबवा. अशी धमकी या मॅसेजमधून देण्यात आली आहे.