फॉर्म अन् विश्रांतीही गरजेचीच

    दिनांक : 06-Jun-2022
Total Views |


वेध

 

गतवर्षीचा Indian cricket team इंग्लंड दौरा, त्यानंतर संयुक्त अरब अमिरातमधील उर्वरित आयपीएल आणि त्यानंतर लगेच भारतात 15 वी आयपीएल झाली. या सर्व स्पर्धांदरम्यान खेळाडूंना आपला फॉर्म कायम राखणे, ही खरं तर तारेवरची कसरत आहे.

 
 
virat kohali1
 

 

अर्थात हा सर्व प्रकार म्हणजे क्रिकेटचा अतिरेक आहे. त्यामुळेच विराट कोहलीला आपल्या आरसीबी संघाचे कर्णधारपद तसेच तिन्ही स्वरूपाच्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद नाईलाजाने सोडावे लागले किंवा त्याला काढून टाकावे लागले.

तसेच चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेचेही झाले. त्यांनाही Indian cricket team फॉर्ममध्ये येण्यासाठी रणजी सामने खेळावे लागले. यात पुजाराने काऊन्टी कि'केट खेळून पुन्हा फॉर्म आणि भारतीय संघात स्थान मिळविले. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व इतर दिग्गज भारतीय खेळाडू खेळले, परंतु ते आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकले नाही. मात्र, सळसळत्या तरुण रक्ताच्या काही नवीन खेळाडूंनी आपल्या कार्यकौशल्याची छाप टाकली आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील नवीन गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. अलीकडेच दोन महिन्यांची आयपीएल स्पर्धा संपली आणि आता लगेच दक्षिण आफि'का भारतात मालिका खेळण्यासाठी दाखल झाला.

 

क्रिकेटच्या Indian cricket team अतिरेकामुळे निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी रोहित शर्मा, कोहली व बुमराहला विश्रांती दिली आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे युवा खेळाडू वेगवान गोलंदाज उमरान मलिक, अर्शदीप सिंग व दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकने अप्रतिम कामगिरी करून भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविले. शर्माला विश्रांती देऊन लोकेश राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

ही मालिका संपत नाही, तोच भारतीय संघ 22 जुलैपासून वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पुरुषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्यामुळे Indian cricket team पुन्हा क्रिकेटपटूंचा फॉर्मचा प्रश्न पुढे येणार आहे. याशिवाय खेळाडूंना होणार्‍या संभाव्य दुखापत हासुद्धा एक मुद्दा असणार आहेच. भारतीय संघाची निळी जर्सी परिधान करणे, हे प्रत्येक कि'केटपटूंचे स्वप्न असतेच. मात्र, त्यासाठी असलेली ही जीवघेणी स्पर्धा अंगावर बेतण्याची शक्यता असते. कनिष्ठ विश्वचषकात चमकदार कामगिरी करून वरिष्ठ गटात आलेल्या पृथ्वी शॉचे उदाहरण बघाना. आज संघाच्या बाहेर आहे, संघात स्थान मिळविण्यासाठी त्याला देशांतर्गत कि'केटमध्ये खेळावे लागले, तो उत्तम खेळलासुद्धा. Indian cricket team आयपीएलमध्येही दुखापतीतून सावरत खेळला. शिखर धवनचीही तीच स्थिती आहे.

 

अर्थात Indian cricket team भारताकडे प्रतिभावान खेळाडूंची वाणवा नाही, परंतु ते जपून ठेवण्यासाठी त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे. खेळात सातत्य असणे हे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच चांगले खेळाडू अधिक काळ टिकवून ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तसेही वयाच्या पस्तिशीच्या जवळपास असलेल्या खेळाडूंनीही भारतीय संघात स्थान मिळविण्याचा अट्टाहास सोडावा व मनाचा मोठेपणा दाखवून प्रतिभासंपन्न नवोदितांसाठी मार्ग मोकळा करावा.