सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आज दिला जाणार

    दिनांक : 30-Jun-2022
Total Views |
मुंबई : उध्दव ठाकरे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे आता स्पष्ट झाल्याने यामुळे राजकीय घडामोडींना सध्या वेग आलेला आहे. सर्वत्र बैठकांवर बैठक आणि भेटीगाठी सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात या नाट्यमय घडामोडींची जोरदार चर्चा होत आहे.
 
 
df & ek
 
 
आज सकाळी अकरा वाजता भाजपची मुंबईत तर एकनाथ शिंदे गटाची गोव्यात बैठक सुरु आहे. या बैठकीत सत्ता स्थापन करण्याचे नियोजन केले जाईल. यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत येऊन फडणवीस यांच्या सोबतीने राज्यपालांची भेट घेणार असून या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. काल रात्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. या अनुषंगाने त्यांनी रात्रीच राज्यपालांकडे दोन्ही पदांचा राजीनामा सुपूर्द केला.