एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार ! देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

    दिनांक : 30-Jun-2022
Total Views |
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळं वळण मिळाले आहे.
 
 
 

devendra
 
 
 
 एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस नव्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.