बच्चू कडू यांना रस्ता गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट

    दिनांक : 30-Jun-2022
Total Views |
मुंबई : एकीकडे ठाकरे सरकार कोसळलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी झालेले प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांना रस्ता गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. अस्तित्त्वातच नसलेल्या रस्त्याच्या कामाच्या बदल्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा एकूण १ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार बच्चू कडू यांनी केला असल्याचा आरोप कडू यांच्यावर केला गेला होता. हे संपूर्ण प्रकरण कोर्टातही पोचून बच्चू कडू यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
 
bacchu kadu 
 
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले बच्चू कडू यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. एकूण तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता.
 
तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका बच्चू कडू यांच्यावर होता. या प्रकरणातून बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मूळात अस्तित्वातच नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. सिटी कोतवाली पोलिसात बच्चू कडू यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता मात्र या संपूर्ण प्रकरणात बच्चू कडू यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचं सांगत पोलिसांनी या प्रकरणी क्लीन चीट त्यांना क्लीन चीट दिली.