भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आयोजित

    दिनांक : 30-Jun-2022
Total Views |
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण? नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी
 
 
मुंबई: पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं असेल, याबाबत चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण? याची संभाव्य यादी :
 

fadanvis 
 
 
 
कॅबिनेट
देवेंद्र फडणवीस
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे
विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील
संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे
डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे
देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे
विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके
राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर
हे राज्यमंत्री होण्याची शक्यता
नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे किंवा राहुल कुल
निलय नाईक
गोपीचंद पडळकर
शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत
 
कॅबिनेट मंत्री
 
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर
राज्यमंत्री
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले
 
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक
 
भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. आज भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील एक दोन दिवसात सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. काल उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवून भाजपनं जल्लोष केला. बहुमत चाचणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मविआला धक्का दिला आणि बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानं सरकार कोसळलं.