नांदुरशिंगोटे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसची 75 वर्ष पूर्ण

    दिनांक : 03-Jun-2022
Total Views |
नांदुरशिंगोटे (जि. नाशिक) : नांदुरशिंगोटे येथे बससेवेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सिन्नर आगारातर्फे लालपरीची पूजा करण्यात आली. येथील बसस्थानकावर उपसरपंच निवृत्ती शेळके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी युवा नेते दीपक बरके, व्हीपी नाईक हायस्कूलचे अध्यक्ष संदीप भाबड, नाना पाटील शेळके, भारत दराडे आदी उपस्थित होते.
 
 
ST
 
महामंडळाचे सोपान बोडके, भारत शेळके तसेच कॅन्टींगचालक बंसी पवार, एकनाथ गवारे आदींसह प्रवासी वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. दत्तात्रय सानप यांच्यासह उपस्थितांनी एसटी संदर्भात माहिती दिली. या लालपरीमुळे होणारी सोय, प्रवासाचे फायदे याबाबत माहिती दिली. तसेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चालक-वाहकांना शुभेच्छा देण्यात आल्या.