नायजेरियामध्ये मंकीपॉक्समुळे पहिला मृत्यू ; 50 देशांमध्ये मंकीपॉक्सचा कहर...

    दिनांक : 29-Jun-2022
Total Views |
.
जिनेव्हा :जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा मंकीपॉक्सबाबत इशारा दिला आहे. WHO ने आपल्या अहवालात मंकीपॉक्सचा प्रसार 50 देशांमध्ये झाल्याची पुष्टी केली आहे आणि नायजेरियामध्ये मंकीपॉक्समुळे पहिला मृत्यू झाला आहे.
 
 
 
 
 
monkey
 
 
 
 
WHO च्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की आतापर्यंत जगातील 50 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 3,413 प्रकरणे आढळून आली आहेत. त्यापैकी 41 नायजेरियात संक्रमित आहेत. नायजेरियातही मंकीपॉक्समुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या अहवालानुसार, 17 ते 22 जून दरम्यान आठ नवीन देशांमध्ये 1,310 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
 
WHO ने जगात मंकीपॉक्सच्या Monkeypox प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. यूकेमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. आता ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेल्या 793 लोकांना समोर आले आहे. या कारणास्तव, यूकेमध्ये देखील अतिरिक्त दक्षता घेतली जात आहे. याशिवाय जर्मनी आणि स्पेनमध्ये हा आकडा पाचशेच्या पुढे आहे. जर्मनीमध्ये मंकीपॉक्सची 521 आणि स्पेनमध्ये 520 प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय पोर्तुगालमध्ये 317, फ्रान्समध्ये 277, कॅनडामध्ये 210, नेदरलँडमध्ये 167, अमेरिकेत 147, बेल्जियममध्ये 77, इटलीमध्ये 85 आणि स्वित्झर्लंडमध्ये 46 रुग्ण मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे.