शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचे खासदार संजय राऊतांना जशास तसे उत्तर

    दिनांक : 28-Jun-2022
Total Views |
मुंबई : शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार सध्या चांगलेच अडचणीत आले आहे. यात भर पडली राजकीय आरोप प्रत्यारोपांची. खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर आमदार दीपक केसरकरांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी दगाबाजी केलेले सर्व आमदार जिवंत प्रेतं आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. गुवाहटीतून ही प्रेतं इथे महाराष्ट्रात येतील अस संजय राऊत म्हणाले होते या वक्तव्यास दीपक केसरकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
 
 

dvkesarkar 
 
दीपक केसरकर यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेचे उत्तर जशास तसेच दिले. प्रेतांच्या मतदानावर राज्यसभेत पाऊल ठेवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, प्रेतांच्या जीवावर तुम्ही राज्यसभेवर निवडून आला आहे त्यामुळे अगोदर राजीनामा द्या.  तुमच्याबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मागे राहिलेले काही शिवसैनिक आहेत. त्यांच्या मतावर निवडून या. नंतर आमच्यावर टीका करा. नैतिक अधिकार पाहिजे. काय बोलताय तुम्ही ? असे खडेबोल एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर  यांनी खासदार संजय राऊतांना सुनावले.