मी केवळ नामधारी राज्यमंत्री होतो : राज्यमंत्री शंभूराजे देसाई

    दिनांक : 28-Jun-2022
Total Views |
मुंबई : संपूर्ण राज्यातील राजकारण विधान परिषदेच्या निकालानंतर आता वेगळ्या वळणावर येऊन पोचले आहे. आज पुन्हा एका बंडखोर शिवसेना आमदाराचा व्हिडियो समोर आले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटातील पाटण विधानसभेतील आमदार आणि राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनीही आता थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप करत मी केवळ नामधारी राज्यमंत्री होतो असे सांगून राज्यमंत्री म्हणून काम करताना आपण फक्त आमदार, पदाधिकाऱ्यांची आणि शिफारस केलेली काम करून देणं एवढचं काम होतं असे देसाई यांनी सांगितले.
 
 

Shambhuraj Desai
 
 
राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पाच खात्यांचा कार्यभार होता. पाच खात्यांच्या कारभाराविषयी सांगताना त्यांनी आपल्याला कोणते अधिकार होते. असा प्रश्न उपस्थित केला. अडीच वर्षात राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार मिळाले नाहीतच हे त्यांनी स्पष्ट केलं. शंभूराजे देसाई यांच्याकडे पाच खात्यांचा कार्यभार असला तरी आपल्याला कोणते आणि काय अधिकार होते हे सागंताना त्यांनी ठाकरे सरकारने आपल्याला राज्यमंत्री म्हणून किती अधिकार दिले असा सवालही त्यांनी केला आहे. आपण फक्त नामधारी राज्यमंत्री होतो हे सांगताना त्यांनी विधानसभेचं कामकाज हाताळणं एवढच काम अशी जाहीर टीकाही त्यांनी यावेळी केली.