जनरल तिकीट बुकिंग संदर्भात रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर

    दिनांक : 28-Jun-2022
Total Views |
जळगाव : मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे अनारक्षित (जनरल) तिकीट २९ जून २०२२ पासून सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी फक्त ठराविक रेल्वे तिकीट खिडक्यांवर अनारक्षित तिकीट मिळत होते; मात्र आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर आणि यूटीएस मोबाईल ॲपद्वारे असे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीत असलेल्या आणि अचानक प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


Railway1 

        थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे अनारक्षित (जनरल) तिकीट २९ जून २०२२ पासून सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
  • यापूर्वी फक्त ठराविक रेल्वे तिकीट खिडक्यांवर अनारक्षित तिकीट मिळत होते.
  • मात्र आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर आणि यूटीएस मोबाईल ॲपद्वारे असे तिकीट मिळणार आहे.
 
 
 
 
कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेगाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी जनरल तिकीट बंद करण्यात आले होते. आरक्षित तिकीट असलेल्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर १ मार्च २०२२ पासून रेल्वेच्या काही विशिष्ट ट्रेनमध्येच जनरल तिकीट सुरू करण्यात आले; मात्र ते ठरावीक रेल्वेसाठीच मिळत होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. आता मध्य रेल्वेने निर्णय घेत यात बदल केला. आता सर्व मेल एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट रेल्वेगाड्यांमध्ये जनरल तिकीट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
येत्या २९ जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्व मेल एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे जनरल तिकीट सर्वत्र मिळणार आहे. यापूर्वी ठरावीक रेल्वेच्या एटीव्हीएम, जीबीएस, अनारक्षित तिकीट मिळणार आहे. त्यामुळे वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणार्‍या प्रवाशांना हा फायदेशीर आहे. त्यांचा प्रवास आता सोपा होणार आहे.