व्यावसायिकांच्या खिशाला बसणार चटका !

    दिनांक : 28-Jun-2022
Total Views |
नवीन कमर्शियल सिलेंडर कनेक्शन महागलं; आता मोजावे लागणार 1050 रुपये अधिक !
 
नवी दिल्ली : मागील काही दिवसांत पेट्रोल, डिझेलचे प्रतिलिटर दर वाढल्याने महागाई उच्चांक गाठत आहे. त्यातच घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढत असल्याने सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडत असल्याचं चित्र आहे.
 
 

commercial-LPG
 
  
 
घरगुती गॅस सिलेंडरचे दर आवाक्याबाहेर जात असताना आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शनच्या दरात 28 जून 2022 पासून तब्बल 1050 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. 19 किलोंच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी पूर्वी 2,550 द्यावे लागत होते आता 3,600 रुपये मोजावे लागणार आहेत.व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याआधी 16 जून 22 रोजी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅस कनेक्शनच्या वन टाइम सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये 750 रुपयांची वाढ केली होती.
 
14.2 किलोच्या सिलेंडरसाठी आता 2,200 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागत आहे. सिक्युरिटी डिपॉझिटच्या रुपात घेतलेले पैसे कनेक्शन परत केल्यानंतर ग्राहकांना दिले जात असले तरी, सातत्याने यात होणारी वाढ सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी असल्याचं बोललं जात आहे. कंपन्यांच्या वतीने 47.5 किलोच्या सिलेंडर कनेक्शनसाठी घेतल्या जाणाऱ्या सिक्युरिटी डिपॉझिटमध्येही वाढ केली आहे. आता ग्राहकांना 7,350 रुपये मोजावे लागतील.
 
यापूर्वी इतक्याच वजनाच्या सिलेंडरसाठी 6,450 रुपये लागत होते. यात 900 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कंपन्यांनी एलओटी व्हॉल्व्हच्या 19 किलो सिलेंडरच्या नवीन कनेक्शनचे सिक्युरिटी डिपॉझिट 4,800 रुपयांवरून वाढवत 5,850 रुपये केलं आहे. याच पद्धतीने 47.5 किलो एलआटी व्हॉल्व्ह सिलेंडरचं सिक्युरिटी डिपॉझिट 8,700 रुपयांवरून वाढवून 9,600 रुपये करण्यात आलं आहे. महागाई आणखी वाढण्याची शक्यता पेट्रोल, डिझेलचे वाढते दर डोकेदुखी ठरत आहेत.