घटक पक्षाकडून शिवसेना संपविण्याचा प्रयत्न - आमदार उदय सामंत

    दिनांक : 28-Jun-2022
Total Views |
मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या दररोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहे. शिवसेना पक्षातून आमदारांची गळती अद्याप सुरूच आहे. सर्व बंडखोर आमदार आणि मंत्री सध्या गुवाहाटी येथे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शिंदे गटाची वाटचाल सुरु आहे. आता चर्चा होतेय ती उदय सामंत यांची. तेही सध्या एकनाथ शिंदे समवेत गुवाहाटीत आहेत. आमदार उदय सामंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. या व्हिडिओमार्फत सामंत यांनी आवाहन केले आहे की माझ्याबद्दल कुणीही गैरसमज करून घेऊ नये. मी शिवसेना पक्षातच कायम असून एकनाथ शिंदे यांना समर्थन द्यायला गुवाहाटीत आलेलो आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
 

us 
 
उदय सामंत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून, त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.