संजय राऊत यांना पुन्हा ED चे समन्स ; उद्याच चौकशीला हजर राहण्याचे आदेश

    दिनांक : 27-Jun-2022
Total Views |
मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड करीत राज्यसरकार अल्पमतात आल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते ED ने समन्स बजावण्यात आले आहेत.
 

raut 
 
 
 
अलिबाग येथील जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत याना ED ने समन्स बाजवले आहेत. शिवाय उद्या म्हणजेच 28 जूनला सकाळी आकरा वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अशी माहिती टीव्ही माध्यमातून मिळते आहे. मात्र ED ची नोटीस अद्याप मिळाली नाही असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. तसेच संध्याकाळपर्यंत नोटीस मिळाल्यास वेळ वाढवून मागणार असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
 
शिंदे गटाकडून याचिका
 
काही वेळातच सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. आमच्याकडे एकूण 51 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यात शिवसेनेचे 39 आमदार आहेत. कालपर्यंत हा आकडा 38 होता. उदय सामंत आल्याने तो 39 झाला आहे. दोन तृतियांशच्या आकड्यासाठी 36 आमदार लागतात. त्यामुळे आमच्याकडे पुरेसा आकडा आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे.