"शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या भुजबळांसोबत बसतांना, तुम्हाला काहीच वाटत नाही का ?" सुभाष साबणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल !

    दिनांक : 27-Jun-2022
Total Views |
ठाणे - सद्य परिस्थितीत राज्यात सत्तासंघर्षाचे वारे वाहत असून गेल्या आठवड्यात शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात घडामोडींना आता वेग आलेला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० हून अधिक सेना आमदार बंड करून गुवाहाटीमध्ये एकवटले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत ही बंडाळी मोडून काढण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, भाजपासोबत पुन्हा युती करण्याची शिंदे गटाची मागणी फेटाळून लावताना उद्धव ठाकरे यांनी माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू असा सवाल केला होता, त्याला आता शिवसेनेचे माजी आमदार आणि आताचे भाजपा नेते सुभाष साबणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
ss 
 
बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यात आलेले सुभाष साबणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू? पण उद्धव ठाकरेजी शिवसेनाप्रमुखाना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलवतांना आपल्याला काहीच वाटत नाही का? असा सवाल सुभाष साबणे यांनी विचारला आहे. छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्यावर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल सुभाष साबणे यांच वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होत.