एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं, सायंकाळी होणार अधिकृत घोषणा

    दिनांक : 25-Jun-2022
Total Views |
मुंबई : राज्यभरात एकनाथ शिंदे हे सध्या चर्चेचा विषय बनलेले असून शिंदेसह शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिंदे गटाची सध्या जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदार आमच्यासोबत आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोर सहकारी आमदारांसह स्वतंत्र गट स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असून याचे नाव देखील ठरल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते.
 
 
eknath shinde2
 
 
एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. यात भर म्हणजे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच समोर आलेल्या शिंदे गटाचं नाव ठरलेलं असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. एकनाथ शिंदे गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. आज संध्याकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे. आता या नावाला शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान बंडखोर आमदारावर कारवाईसाठी शिवसेनेकडून पाऊल उचलली जात आहेत.