आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीकडे सर्वांचे लक्ष

    दिनांक : 25-Jun-2022
Total Views |
मुंबई : राजकीय घडामोडींना सध्या तीव्र वेग आलेला असून सर्वत्र महत्वाच्या बैठकी आणि मान्यवरांच्या भेटीगाठी सुरु झालेल्या आहेत. यामुळे राजकारण ढवळून निघाल्याचे स्पष्ट होते. आज शिवसेनेची दुपारी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. या बैठकीत नेमके काय होणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. शिवसेना पूर्ण तयारीनिशी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गट देखील आव्हान देत आहेत. त्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत कोण जिंकणार कोण हरणार हे आता वेळच ठरवेल.
 
 
 shivsena
 
 
मुंबईत आज दुपारी एक वाजता शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक घेतली जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यात काही महत्वाचे निर्णय घेणार असून यात शिंदेसोबत गेलेल्या आमदारांची पदे काढण्यात येतील असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर काय कारवाई होणार ? आणि इतर आमदार परत येणार का ? हे आज स्पष्ट होईल. दोन्ही बाजूने जोरदार लढत सुरु झालेली आहे. आपापल्या परीने दोन्हीजण प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे.