स्त्री शक्तीचा जागर...

    दिनांक : 25-Jun-2022
Total Views |


वेध


Draupadi द्रौपदी महाभारतातील मुख्य नायिका. तिला कृष्णा,  पांचाली आणि याज्ञसेनी या नावांसोबतच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या पाच पांडव भावांची पत्नी म्हणून तिची ओळख!

 
 

murmu 

 

 
 
त्या काळातील सर्वात प्रभावशाली स्त्री म्हणून द्रौपदीचे वर्णन केले जाते. ती अनेक योद्ध्यांचा अंत आणेल, अशी भविष्यवाणी महाभारत काळात केली गेली होती. एका कथेनुसार जेव्हा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालचा वध केला तेव्हा कृष्णाचे बोट कापले गेले. त्यातून रक्ताची धार वाहत असलेली पाहून द्रौपदीने आपला भरजरी शेला फाडून त्याची चिंधी कृष्णाच्या बोटावर बांधली होती. त्यानंतर तुझ्या साडीची किंमत चुकवेन असा आशीर्वाद श्रीकृष्णाने द्रौपदीला दिला होता. एकंदरीत महाभारतातील द्रौपदीची आठवण होण्याचे कारण म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदावर देशाच्या प्रथम नागरिक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजातील Draupadi द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले.
 

मतदारांचे संख्याबळ आणि राजकीय व्यूव्हरचना लक्षात घेता Draupadi द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वोच्च पदावर सहज विराजमान होऊ शकतात. संविधानात राष्ट्रपती या पदाला सर्वोच्च स्थान असले, तरी यापूर्वीच्या सरकारांना राष्ट्रपती रबरी शिक्काच हवा होता. मोदी सरकारने मात्र तो पायंडा मोडीत काढला, तो रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती करून; जातीपल्याड राजकारण करीत असल्याचे एक सूचक उदाहरण ठेवले. त्यानंतर पुन्हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या डोक्यालाही शिवणार नाही असा निर्णय घेत आदिवासी समाजातील शिक्षित महिलेला राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिली. Draupadi द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी येथे झाला. त्या संथाल या आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर राजकारणात उडी घेतली. त्या 2000 आणि 2009 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतमध्ये नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या. नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. बिजू जनता दल आणि भाजपाच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक नंतर मत्स्य विभागाच्या मंत्री ही पदे सांभाळली. 2015 मध्ये मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार्‍या त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या.

 

भाजपाच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी 2013 ते 2015 मध्ये काम केले आहे. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही पंचायत राज व्यवस्थेच्या अंतर्गत सरपंच होते. त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले आहे. देशाच्या सर्वोच्च पदी एका मागास समाजातील व्यक्तीची निवड करणे म्हणजे पर्यायाने त्या समाजापर्यंत विकासाचा किरण पोहोचविणे होय. झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये लोकभाषा शिक्षकांच्या नियुक्तीचा आग्रह धरला होता. आदिवासी जमीन हक्क कायद्यातील दुरुस्त्या त्यांनी फेटाळल्या आणि त्यावर ठाम राहिल्या. राष्ट्रपतिपद हे संविधानिक सर्वोच्च पद आहे. त्या पदाची गरिमा राखत देशहितार्थ कार्य व्हावे यावर ठाम असणारा राष्ट्रपती देशाला हवा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाचा पल्ला अतिशय वेगाने गाठतो आहे. दरम्यान, त्याच काळात राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर श्रीकृष्णाच्या रक्तबंबाळ बोटाला बांधण्यासाठी भरजरी शेल्याची चिंधी फाडणारी म्हणजेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक भावना जोपासणारी (नाम साम्य) Draupadi द्रौपदी बसते आहे. या देशाच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक भावनांचा आदर करणारा राष्ट्रपती देशाला लाभेल, असा विश्वास व्यक्त करू या!

 
- प्रफुल्ल व्यास
 

- 9881903765